शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गाची सुरक्षा धोक्यात

By admin | Updated: August 29, 2015 22:13 IST

मुंबई - गोवा महामार्ग सुरळीत ठेवण्यासाठी पळस्पे ते रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत महामार्गावर २५ वर्षांपूर्वी ७ वाहतूक शाखेची निर्मिती करण्यात आली. मात्र सध्या महामार्ग महाड वाहतूक

दासगाव : मुंबई - गोवा महामार्ग सुरळीत ठेवण्यासाठी पळस्पे ते रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत महामार्गावर २५ वर्षांपूर्वी ७ वाहतूक शाखेची निर्मिती करण्यात आली. मात्र सध्या महामार्ग महाड वाहतूक शाखेची अवस्था बिकट झाली असून या ठिकाणी तीन अधिकारी व ३३ कर्मचारी अशी नेमणूक असताना फक्त चार कर्मचारी काम करत असल्याने ते सध्या पुरेशी सेवा देऊ शकत नाही. यामुळे सध्या महामार्ग महाड वाहतूक शाखेअंतर्गत असणाऱ्या विभागाची सुरक्षा धोक्यात आली आहे.मुुंबई - गोवा महामार्गावर पळस्पे, वाकण, महाड, कशेडी, चिपळूण, हात खांबा, कसाल या ५०० किलोमीटर अंतरावर महामार्ग पोलीस वाहतूक शाखेची निर्मिती करत या ठिकाणी महामार्गालगत चौक्या उभारण्यात आल्या. महामार्गावर वाढती वाहतूक, होणारे अपघात व येणाऱ्या इतर अडचणी दूर करण्यासाठी या शाखांची निर्मिती करण्यात आली. मात्र गेले वर्षभर या ठिकाणी फक्त १ अधिकारी व १४ कर्मचारी काम करीत आहेत. पोलीस महामार्ग महाड शाखेतून १ अधिकारी व ८ कर्मचारी नाशिक कुंभमेळ्याच्या बंदोबस्तासाठी गेले आहेत तर १ कर्मचारी पनवेल कार्यालयात काम करत असून १ कर्मचारी रजेवर आहे. अशा या बिकट परिस्थितीत महाड वाहतूक शाखेत फक्त ४ कर्मचारी २४ तास सेवा देत आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता मात्र ते रजेवर असल्याने संपर्क होऊ शकला नाही. महामार्गाच्या सुरक्षेसाठी पुरेसा कर्मचारीवर्ग आवश्यक असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.१० सप्टेंबरपासून लाखो गाड्यांची वर्दळयेत्या १७ सप्टेंबरपासून गणपती हा सण कोकणात सुरु होणार आहे. १० सप्टेंबरपासूनच लाखो गाड्यांची वर्दळ या महामार्गावर सुरु राहणार आहे, असे असताना महामार्ग मध्य वाहतूक शाखेत ४ कर्मचारी काम करत असल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत हे चार कर्मचारी शाखा सांभाळतील की महामार्गावर लोकांना सेवा देतील हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.