शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

भंगार गोदामाला भीषण आग

By admin | Updated: April 21, 2017 00:24 IST

महाड औद्योगिक क्षेत्रातील एका भंगार गोदामाला अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण गोदाम खाक झाले. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर दोन

महाड : महाड औद्योगिक क्षेत्रातील एका भंगार गोदामाला अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण गोदाम खाक झाले. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर दोन अग्निशामकांनी ही आग आटोक्यात आणली. गुरुवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीत सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी महाड औद्योगिक क्षेत्रातील बेकायदा भंगार गोदामाचा मुद्दा यानिमित्त पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे दिसून येत आहे.औद्योगिक क्षेत्रातील श्रीहरी केमिकल्स कारखान्याच्या जवळील टेमघर गावच्या हद्दीत असलेल्या या भंगार गोदामात रसायनांचे रिकामे ड्रम्स, प्लास्टिक सामानासह रासायनिक पदार्थांचे पॅकिंग मोठ्या प्रमाणावर असल्याने अचानक लागलेल्या आगीने रासायनिक व ज्वलनशील पदार्थाने काही क्षणार्धात पेट घेतला व आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीच्या लोंढ्याने आजूबाजूच्या परिसरात व आकाशात उंच धुराचे लोळ पसरले गेले. महाड नगरपरिषद व एमआयडीसीच्या अग्निशामकांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र संपूर्ण गोदाम खाक झाल्याने दिसून आले. (वार्ताहर) महाड औद्योगिक क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे बेकायदा भंगार गोदामांचे अड्डे मोठ्या संख्येने असून औद्योगिक विकास महामंडळ, पोलीस यंत्रणा, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे या बेकायदा भंगार गोदामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.दोन वर्षांपूर्वी अशाच एका बंद कारखान्याच्या आवारात बेकायदा थाटलेल्या भंगार गोदामात रसायनांचा स्फोट होवून तिघा जणांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर देखील या बेकायदा भंगार गोदामांवर व ते चालवणाऱ्यांवर कुठलीही कारवाई झाली नव्हती. केमिकल झोन म्हणून ओळख असलेल्या या महाड औद्योगिक क्षेत्रात अशा प्रकारचे भंगार गोदाम अत्यंत धोकादायक असतानाही प्रशासन याकडे दुर्लक्ष करते, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या औद्योगिक क्षेत्रात फेरफटका मारल्यास हे औद्योगिक क्षेत्र म्हणजे बेकायदा भंगार अड्ड्यांचे आगारच असल्याचे दिसून येईल.