शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सिस्केपकडून मगरीचे सुरक्षित स्थलांतर, कामगारांचा जीव भांड्यात पडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 20:42 IST

मगरींच्या आश्रयस्थानासाठी महाड येथील सावित्री आणि गांधारी या नद्यांची नवी ओळख निर्माण झाली आहे.

जयंत धुळप /अलिबाग 

रायगड - मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात महाड जवळील मोहोप्रे येथे गांधारी नदीवरील जुन्या पुलाशेजारी नवीन पुलाचे काम सुरू आहे. या कामाचेवेळी नदीच्या पात्रातील पिलरच्या उभारणीसाठी खणलेल्या खड्ड्यात नदीपात्रातील मगर घुसल्याने कामगारांमध्ये घबराट निर्माण झाली होती. वनखात्याच्या महाड विभाग आणि सिस्केप संस्था यांच्या सहकार्याने या मगरीचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले असून मगरीच्या या स्थलांतर मोहिमेत सिस्केपच्या नवीन सदस्यांनी विशेष मेहनत घेतली होती.

मगरींच्या आश्रयस्थानासाठी महाड येथील सावित्री आणि गांधारी या नद्यांची नवी ओळख निर्माण झाली आहे. सावित्रीनदीच्या उथळ पात्राच्या काठावर मगर पाहणे हा अनेकांचा छंद झालेला आहे. या नद्यांमध्ये एकीकडे मासेमारी आणि जवळच मगरींचे वास्तव्य असेही चित्र पाहायला मिळत असल्याने या मगरी हिंस्त्र प्रजातीमध्ये मोडत नाहीत. तरीही मगर म्हटली की जी स्वाभाविक भिती असते ती मात्र प्रत्येकजणाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. पण, सिस्केप संस्थेच्या प्रबोधनामुळे पात्रातून बाहेर आलेल्या अनेक मगरींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे सोपे होत आहे. आज महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात मोहोप्रे जवळील गांधारी नदीवरील नवीन पुलाच्या कामामध्ये एक मगर दिसल्याने काम ठप्प झाले होते. वनखात्याशी संपर्क साधल्यानंतर सिस्केप संस्थेचे योगेश गुरव, प्रणव कुलकर्णी, मित डाखवे, ओम शिंदे, अक्षय भोवरे, ओमकार वारणकर, नितीन कदम व इतर सदस्य हे घटनास्थळी पोहचले. यांच्यासोबत वनखात्याचे श्री. पी. डी. जाधव व श्री. पाटील होते. दोरखंडाच्या सहाय्याने मगरीचे तोंड बंद करून तिला पोत्यामध्ये बांधण्यात आले. सिस्केपच्या नवीन सदस्यांनी याआधी मगरीच्या रेस्क्यू आँपरेशनमध्ये सहभाग घेतला नसल्याने त्यांच्यासाठी हा पहिलाच प्रसंग होता. योगेश गुरव, मित्र डावे, प्रणव कुलकर्णी हे प्रशिक्षीत असल्याने त्यांनी पहिला टप्पा पार केल्यानंतर नवीन सदस्यांनी मगरीला बांधण्यासाठी  मदत केली. त्यानंतर या मगरीचे स्थलांतर महाड स्मशानभूमीच्या मगरींच्या वसाहतीजवळील सावित्रीनदीत तिला सुरक्षित सोडण्यात आले. ही मगर साडेसात फुट लांब मादी जातीची होती. 

सावित्री व गांधारी नदीच्या पात्रात महाड ते म्हसळा परिसरापर्यंत या गोड्या पाण्यातील मगरींच्या प्रजातीची संख्या खूप वाढत आहेत. या वाढत्या संख्येमुळे त्यांचे नैसर्गिक स्थलांतर अनेक पाणथळ भागात होत असते. विणीच्या हंगमात नर जातीचा मगर हा त्याच्यापेक्षा लहान असलेल्या मगरींना त्याच्याजवळून दूर पळवत असतो. याचवेळी नदीच्या पात्राजवळील बंद असलेल्या दगडांच्या खाणीतील डबके, तलाव, शेततळी अशा पाणी असलेल्या ठिकाणी त्यांचे स्थलांतर होत असते. जमिनीवरून चालत ते हे स्थलांतर करीत असतात. साधारण हा विणीचा हंगाम जानेवारी महिन्यापासून सुरू होतो. मे महिन्याच्या आसपास अंड्यांतून पिल्ले बाहेर येत असतात. विणीच्या हंगामातच मगरी या जास्त आक्रमक असू शकतात. त्यामुळे शक्यतो जानेवारी पासून चार महिने मासेमारी करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. यामुळे मगरी आणि मनुष्य दोन्हींचे संरक्षण होईल अशी माहिती सिस्केप संस्थेचे योगेश गुरव यांनी दिली. आज झालेल्या मगरीच्या स्थलांतरादरम्यान नागरीकांनी व तेथील कामगारांनी गर्दी केली होती. सिस्केपच्या नवीन सदस्यांनी या मगरीच्या स्थलांतर मोहिमेत भाग घेतल्याने मगरींबाबतची भिती दूर होण्यास मदत झाली असून महाड ते म्हसळा तालुक्यात कुठेही अशा मगरी आढळून आल्यास महाडच्या सिस्केप संस्थेशी संपर्क साधावा, असे सिस्केप संस्थेचे प्रणव कुलकर्णी यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :alibaugअलिबागRaigadरायगड