शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

बारा कोटींचा निधी मिळूनही रस्त्याची दैना

By admin | Updated: April 30, 2017 03:43 IST

अलिबाग-रेवस रस्त्यासाठी बारा कोटी रुपयांचा निधी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील व आमदार पंडित पाटील यांच्या मागणी व पाठपुराव्याअंती

अलिबाग : अलिबाग-रेवस रस्त्यासाठी बारा कोटी रुपयांचा निधी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील व आमदार पंडित पाटील यांच्या मागणी व पाठपुराव्याअंती राज्य सरकारने मंजूर केला. मात्र, अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे कार्यादेश काढण्यास दिरंगाई झाली. त्याचा नाहक त्रास या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शिवसेनेचे सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. बी. पाटील यांना घेराव घालून जाब विचारला.शनिवारी शेकापचे जिल्हा परिषदेचे सदस्य तथा विक्रम मिनीडोअर चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष दिलीप भोईर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी रास्ता रोको करण्यात आला. परिणामी, अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभाग पुरता हादरून गेला आहे. दरम्यान, अभियंता व्ही. बी. पाटील यांनी शुक्रवारी सुरेंद्र म्हात्रे यांना अलिबाग-रेवस रस्त्याचे काम सत्वर सुरू करणार, असे लेखिपत्र दिले तर येत्या ३ मेपर्यंत कार्यादेश काढण्यात येणार असून १५ मेपर्यंत रस्त्याचे काम सुरू होईल, अशी लेखी हमी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एम. एस. देशपांडे यांनी शनिवारी दिलीप भोईर यांना दिली. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. अलिबाग-रेवस हा २२ कि.मी. मार्गावरील रस्ता गेली काही वर्षे खड्ड्यांमुळे कायमच चर्चेत राहिला आहे. पावसाळा तोंडावर आलेला असतानाही अलिबाग-रेवस आणि कनकेश्वर-कार्लेखिंड या रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शनिवारी अलिबाग-रेवस रस्त्यावर आरसीएफ गेटसमोर रास्ता रोको आंदोलन पुकारले. शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते, जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर तथा विक्र म मिनीडोअर चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष दिलीप भोईर यांच्या नेतृत्वाखाली हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी ९:३० वाजल्यापासून सारळ पूल, मांडवा दस्तुरी, झिराड नाका आणि आर.सी.एफ.च्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्ता अडविण्यात आला होता. या वेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग, नितीन राऊत, दीपक म्हात्रे, तसेच रिक्षाचालकांसह स्थानिक ग्रामस्थही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचाही सहभाग होता. आंदोलनकर्ते चांगलेच आक्रमक झाले. तातडीने रस्त्याचे काम हाती घेण्यात यावे, दर्जा राखावा, अशी मागणी होत होती. या वेळी अलिबाग-रेवस मार्गावर वाहतूककोंडी झाली होती. (विशेष प्रतिनिधी)रस्त्याचे काम १५ मेनंतर- सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता देशपांडे घटनास्थळी आले. रस्त्याचे काम १५ मे नंतर करण्याचे त्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी त्यांना धारेवर धरले. - अलिबाग-रेवस मार्गावरील सारळ पुलापासूनच आंदोलनाला सुरूवात झाली होती. ठिकठिकाणी वाहने अडविण्यात येत होती. जवळपास दीड ते पावणेदोन तास वाहतूककोंडी झाली होती.