शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

आगरदांडा बंदरातील रस्तेवाहतूक रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 22:49 IST

२७०० कोटींचा प्रकल्प : बंदराचे काम पूर्ण; चौपदरीकरणाचे काम धिम्या गतीने; अवजड वाहतुकीला ब्रेक

- संजय करडे 

मुरु ड जंजिरा : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी व मुरु ड तालुक्यातील आगरदांडा येथे जेएनपीटीच्या धर्तीवर दोन मोठे बंदर विकसित करण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासन व खासगी विकासकाच्या माध्यमातून सुमारे २७०० कोटी रु पये खर्च करून बंदराचे काम सुरू करण्यात आले आहे. पैकी श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथे बंदर विकसित झाले असून, या प्रकल्पाचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे; परंतु मुरुड तालुक्यातील आगरदांडा येथील दुसऱ्या टप्प्याचे काम केवळ रस्त्याच्या अरुंदीकरणामुळे रखडले आहे.

परदेशातून येणार दगडी कोळसा व अन्य कच्चा माल नियोजित ठिकाणी नेण्यासाठी १२ चाकी ट्रेलरला वाहतुकीत बाधा येत आहे. केवळ वाहतूकसमस्येमुळे आगरदांडा येथील बंदराचा अंतिम टप्पा रखडला असून औद्योगिक प्रगती खुंटली आहे.

गेल्या पाच वर्षांपासून आगरदांडा बंदरातून मालाची वाहतूक होत नसल्याने स्थानिकांना रोजगार मिळू शकला नाही. जमीन खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने आगरदांडा परिसर मागास राहिला आहे. स्थानिक तरुणांना या कंपनीत नोकºया मिळणार होत्या; परंतु बंदराचा विकासच न झाल्याने शेकडो तरुण रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत.

बंदराच्या विकासापूर्वी या ठिकाणी मोठी रेलचेल दिसून येत होती. स्थानिक विद्यार्थी पोर्टला आवश्यक असणाऱ्या जागांसाठी विविध ट्रेंडचे प्रशिक्षण घेण्यासाठीसुद्धा गेले होते; परंतु आगरदांडा बंदर सुरू न झाल्याने बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे.

आगरदांडा येथील बंदर विकासाचे काम पूर्ण झाले आहे; परंतु बोटीद्वारे माल उतरवला जात नसल्याने कर्मचारी नियुक्त झालेले नाहीत. आगरदांडा-इंदापूर रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, काम रखडल्याने त्याचा परिणाम आगरदांडा बंदरातील मालवाहतुकीवर होत आहे.कंपनी गेटपर्यंत भुयारी मार्गआगरदांडा बंदराचे पूर्ण काम झाले आहे. केवळ रस्ता रुंदीकरणाची कामे रखडल्याने बंदरातून मालवाहतूक होऊ शकत नाही. दिघी येथे जहाजांची रेलचेल सुरू असून या प्रकल्पाचा एक भाग सुरू आहे.आगरदांडा ते इंदापूर हा चौपदरी रस्ता मंजूर करण्यात आलेला असून जून २०१९ पर्यंत हा रस्ता बनवण्याची ठेकेदारांना अंतिम मुदत देण्यात आली आहे.आगरदांडा येथील लोकवस्तीला कोणताही त्रास होऊ नये म्हणून डोंगर फोडून अंतर्गत भुयारी मार्ग थेट कंपनी गेटपर्यंत रस्ता आणणार असल्याची माहिती सूर्यकांत साहू यांनी दिली. त्याबरोबरच रोहा ते आगरदांडा रेल्वेमार्गालाही मंजुरी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. 

आगरदांडा बंदर लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न आहे. विदेशातून येणारा माल हा १२ ते १६ चाकी ट्रेलरने नियोजित ठिकाणी पोहोचवण्यासाठी रस्त्याची रुं दी खूप मोठी असणे आवश्यक आहे. मुळातच आगरदांडा येथील रस्ते हे खूप निमुळते व अरुं द असल्याने वाहतुकीची समस्या गंभीर आहे.- सूर्यकांत साहू, व्यवस्थापक, ठेकेदार कंपनी

टॅग्स :Raigadरायगड