शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

जाळ्यात अडकून पडलेल्या दुर्मिळ ब्राह्मणी घारीची सुटका; वनविभागाच्या दिलं ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 18:22 IST

उरण तालुक्यातील वेश्वी गावातील रहिवासी लक्ष्मण मुंबईकर यांनी गावकुसाबाहेर मासळी संवर्धनासाठी तलाव खोदला आहे

मधुकर ठाकूर

उरण : मासळी संवर्धनासाठी खोदलेल्या तलावाच्या सभोवार संरक्षणासाठी लावलेल्या जाळ्यात अडकून पडलेल्या दुर्मिळ ब्राह्मणी घारीला वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी मोठ्या शिताफीने सुटका केली आहे.

उरण तालुक्यातील वेश्वी गावातील रहिवासी लक्ष्मण मुंबईकर यांनी गावकुसाबाहेर मासळी संवर्धनासाठी तलाव खोदला आहे.मासळी असलेल्या तलावाच्या संरक्षणासाठी काठाच्या सभोवताली नायलॉनची जाळी लावण्यात आल्या आहेत.तलावातील मासे खाण्यासाठी दुर्मिळ ब्राह्मणी घार तलावाच्या दिशेने झेपावली.मात्र मासे खाण्याच्या प्रयत्नात संरक्षणासाठी लावलेल्या जाळ्यात अडकली. पाय, पंख जाळ्यात अडकल्याने सुटकेसाठी घारीचे जोरदार प्रयत्न सुरु होते.मात्र सुटकेच्या प्रयत्नात जाळ्यात आणखीनच अडकत चालली होती. सुदैवाने लक्ष्मण मुंबईकर हे तलावाची पाहणी करण्यासाठी आले होते. जाळ्यात अडकुन पडलेली आणि जाळ्यातून सुरक्षितरित्या बाहेर पडण्यासाठी दुर्मिळ ब्राह्मणी घारीची सुरू असलेली धडपड त्यांच्या दृष्टीस पडली.मुंबईकर यांनी तत्काळ वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष आनंद मढवी यांच्याशी संपर्क साधुन माहिती दिली.मढवी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.जीव वाचवण्यासाठी जाळ्यात अडकलेल्या दुर्मिळ ब्राह्मणी घारीची जीवाच्या आकांताने धडपड सुरू होती.

आनंद मढवी आणि त्यांच्या शुभम मढवी, मनीष मढवी,मयूर मढवी, पीयूष लोंगळे,विनीत मढवी, पंकज घरत, दिलीप मढवी, बंटी शेळके, सुमित मढवी, नितीन मढवी, महेश भोईर, अभिमन्यू पाटील, रुपेश भोईर, बाळा कोळी, सुनील नाईक आदी सहकाऱ्यांनी अधिक वेळ दवडता जाळ्यात अडकलेल्या दुर्मिळ ब्राह्मणी घारीची मोठ्या प्रयासाने सुटका केली. त्यानंतर आनंद मढवी यांनी  दुर्मिळ ब्राह्मणी घारीची माहिती वनविभागाला दिली.वनक्षेत्रपाल शशांक  कदम,एस. बी. इंगोले, हरिदास करांडे, आर. एस. पवार, श्रीमती आशा वाळे, डी.डी. पाटील आदी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घारीची प्राथमिक आरोग्य तपासणी केली.तपासणीत शरीराला कोणत्याही प्रकारची दुखापत,जखम झाली नसल्याचे   निदर्शनास आले.त्यानंतर दुर्मिळ ब्राह्मणी घारीला वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांच्या मदतीने  दुधेला जंगलात नैसर्गिक आवासात मुक्त करण्यात आले.