रणवीर, दीपिकाने अलिबागकर होण्यासाठी मोजले तब्बल २२ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 05:37 AM2021-09-14T05:37:52+5:302021-09-14T05:38:09+5:30

मापगाव येथे घेतली दाेन एकर जमीन, बंगला

ranveer deepika counted Rs 22 crore to become Alibagkar pdc | रणवीर, दीपिकाने अलिबागकर होण्यासाठी मोजले तब्बल २२ कोटी

रणवीर, दीपिकाने अलिबागकर होण्यासाठी मोजले तब्बल २२ कोटी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

रायगड : अभिनेता रणवीरसिंग, त्याची पत्नी अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी अलिबाग-मापगाव येथे तब्बल दाेन एकर १० गुंठे जमीन खरेदी केली आहे. येथेे १७ हजार ४५० चाै. फुटांचे घरही आहे. के. ए. एंटरप्रायजेस एलएलपीतर्फे नियुक्त भागीदार दीपिका पदुकाेण आणि आर. एस. वर्ल्डवाईड एंटरटेनमेंट प्रा.लि.तर्फे संचालक रणवीर सिंह भावनानी यांनी हा खरेदीव्यवहार केला आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
हा व्यवहार सुमारे २२ काेटींना झाल्याची माहिती आहे. रणवीर आणि दीपिका यांनी घर आणि जमीन खरेदी केल्याने ते आता अलिबागकर झाले आहेत. उद्याेगपती रतन टाटा यांनीही अलिबाग-वरसाेली येथे वास्तव्य केले आहे. त्याचप्रमाणे अन्य उद्याेगपती, सिने कलाकार, जागतिक कीर्तीचे खेळाडू यांनाही अलिबागचा माेह आवरलेला नाही. त्यांनीही येथे बंगले बांधले आहेत. काही चित्रपटांत ‘अलिबाग से आया है क्या’ असे संवाद आपण नेहमीच कलाकारांच्या ताेंडून ऐकत असताे. आता तेच अलिबागच्या प्रेमात पडल्याचे दिसून येते.

खरेदी-विक्री व्यवहारासाठी सोमवारी दीपिका आणि रणवीर हे अलिबागच्या मुख्य दुय्यम निबंधक कार्यालयात आले हाेते. त्यावेळी चाहत्यांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली हाेती. मात्र रणवीरने आपला चेहरा मास्क आणि अंगात परिधान केलेल्या हुडीने झाकला हाेता, तर दीपिकाने मास्क परिधान केला हाेता.

Web Title: ranveer deepika counted Rs 22 crore to become Alibagkar pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app