शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

उरणमधील रानसई धरणाची पाणी पातळी खालावली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2021 12:42 AM

६४ दिवस पुरेल इतकेच पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : उरण परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणातील पाण्याची पातळी खालावली असून नागरिकांना फक्त पुढील  ६४ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे उरणकरांचा  पाणीपुरवठा या  आठवड्यापासून मंगळवार आणि शुक्रवार असा दोन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उरण विभागाचे प्रभारी उपअभियंता रणजित काळेबाग यांनी दिली.उरणकरांची तहान भागवण्यासाठी तालुक्यातील रानसई एकमेव धरण आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या या रानसई धरणातूनच उरण तालुक्यातील ३७ ग्रामपंचायती, उरण नगर परिषद आणि परिसरातील काही औद्योगिक कंपन्यांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र या वर्षी रानसई धरणात येत्या एप्रिल महिन्यापर्यंत नागरिकांना पुरेल इतकाच ६४ दिवसांचा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यातच  कडक उन्हाच्या तडाख्याने रानसई धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची  पातळी आणखीनच कमी होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय मागील वर्षात पावसाचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळेही उरणच्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईची झळ बसणार नाही याची धोरण उरण एमआयडीसीने स्वीकारले आहे. यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून शहरी व ग्रामीण भागातील पाणीपुरवठा आठवड्यातून मंगळवारी आणि शुक्रवारी असा दोन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी उपअभियंता रणजित काळेबाग यांनी दिली. 

हेटवणेतून घेतले जाते पाणी एमआयडीसीकडून दहा एमएलडी पाणीपुरवठा करण्याची मागणी केली जाते. मात्र सिडकोकडून पाच एमएलडी इतके मिळते. त्यामुळे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि उरणकरांना पावसाळ्यापर्यंत सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी वाया न घालवता जपून वापर करावा असे आवाहनही काळेबाग यांनी केले आहे.