शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानचे कारागीर रायगडमध्ये

By admin | Updated: September 1, 2015 04:38 IST

बाप्पाचे आगमन लवकरच होणार असून बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे ढोल, ताशे, ढोलकी आदी वाद्ये बनविणारे कारागीर कामात दंग असल्याचे पहावयास मिळते.

अमुलकुमार जैन, बोर्ली-मांडलाबाप्पाचे आगमन लवकरच होणार असून बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे ढोल, ताशे, ढोलकी आदी वाद्ये बनविणारे कारागीर कामात दंग असल्याचे पहावयास मिळते. गणेशोत्सव जवळ आल्याने राजस्थान येथून आलेले हे कारागीर घरोघरी तसेच गणेश मंडळांकडे जाऊन ढोलकी विक्री करीत आहेत.वाद्याच्या तालावर महाराष्ट्रामधील लोककला जिवंत आहे. गणेशोत्सवात सर्वात जास्त महत्त्व हे ढोल-ताशाला आहे. या ढोल-ताशांच्या गजरातच बाप्पाचे स्वागत केले जाते. त्यामुळे गणेशोत्सवामध्ये ढोल-ताशाला भरघोस मागणी असते. यंदा ढोल-ताशांची विक्री चांगली झाली असून मागणी वाढली असल्याची माहिती मुरुड तालुक्यातील बोर्ली येथे जयपूर (राजस्थान) येथून आलेले महमद रईस यांनी दिली. ते म्हणाले की, ढोलकीसाठी आवश्यक असणारे ढोलक हे उत्तर प्रदेशमधील कानपूर, सुलतानपूर येथून येतात तर ढोलकीसाठी लागणारे चामडे उत्तर प्रदेशमधील मेरठ येथून आणले जाते तर मेणबत्तीचे मेण फासून त्यावर दिलेल्या रंगावर चमक दिली जाते. अशा प्रकारच्या लहान ते मोठ्या ढोलक्या ते बनवीत असतात.२०० रुपयांपासून १२५० पर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या आणि आकाराच्या ढोलक्या उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. गणपतीनंतर ही मंडळी गोव्याला जातात. येथून नवरात्रोत्सवासाठी गुजरात राज्यात जातात. (वार्ताहर)