शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांच्या जयघोषाने रायगड दुमदुमला, ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 19:28 IST

हा सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी देशभरातून लाखो शिवभक्तांनी गडावर हजेरी लावली होती.

आलिबाग/कोल्हापूर: लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत किल्ले रायगडावर शुक्रवारी ३५१ वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला. पावसाळ्यातील आल्हाददायी वातावरणात ढोल, ताशे, नगारे आणि पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले शिवभक्त यामुळे रायगडावर शिवकाळ जागा झाला. हा सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी देशभरातून लाखो शिवभक्तांनी गडावर हजेरी लावली होती.किल्ले रायगडावर गेले दोन दिवस पारंपरिक मर्दानी खेळ, पोवाडे, जागरण, गोंधळ, आणि ढोलताशे नगाऱ्यांनी वेगळेच वातावरण निर्माण केले होते. श्रीशिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने गेली अनेक वर्षे रायगडावर या सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. यावर्षीदेखील समितीने अत्यंत नियोजनबद्ध असे दिमाखदार सोहळ्याचे आयोजन केले. गडावर या निमित्ताने लाखो शिवभक्त दोन दिवस आधीच दाखल झाले होते. यामुळे संपूर्ण रायगड छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमून गेला.राज सदरेवर या सोहळ्याला सुरुवात झाल्यानंतर समोर बसलेल्या लाखो शिवभक्तांनी एकच जल्लोष केला. शिवराज्याभिषेक गीताने या सोहळ्याची सुरुवात झाली. विधिवत पूजा केल्यानंतर महाराष्ट्रातील विविध नद्यांच्या आणलेल्या जलाने अभिषेक करण्यात आला. यावेळी युवराज संभाजीराजे छत्रपती आणि त्यांचे पुत्र शहाजीराजे छत्रपती, संयोगिता राजे, आमदार संजय गायकवाड, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.छत्रपती शिवरायांच्या पालखीचे आगमन राजसदरेवर झाले. राज सदरेवरील उत्सव मूर्तीस अभिषेक करण्यात आला. येथील छत्रपती शिवरायांच्या सिंहासनारूढ मूर्तीस सुवर्णमुद्रांचा अभिषेक करण्यात आला. या सोहळ्याचे नियोजन फत्तेसिंह सावंत, सुखदेव गिरी, संदीप खांडेकर, अमर पाटील, विनायक फाळके, संजय पवार आदींनी केले.

दोन शिवभक्तांची तब्येत बिघडलीराज्यातून अनेक शिवभक्त शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर उपस्थित होते. यापैकी दोन शिवभक्तांची तब्येत बिघडली. एका शिवभक्ताला चक्कर आली तर दुसऱ्याला उन्हाचा त्रास जाणवला. दोन्ही शिवभक्तांना तातडीने आरोग्य सुविधा देण्यात आली.

शिवभक्तांसाठी अन्नछत्रशिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आलेल्या शिवभक्तांसाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगडतर्फे अन्नछत्र सुरू करण्यात आले होते. त्यामुळे अन्नछत्राच्या ठिकाणी शिवभक्तांनी जेवणाचा आस्वाद घेतला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaigadरायगडShivrajyabhishekशिवराज्याभिषेक