शहरं
Join us  
Trending Stories
1
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
2
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
3
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
4
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
5
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
6
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
7
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
8
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
9
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
10
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
11
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
12
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
13
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
14
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
15
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
16
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
17
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
18
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
19
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
20
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा

Raigad: ग्रामीण भागात क्यूआर कोडची चलती, वाढत्या आधुनिकीकरणातून अनेक हायटेक बदल

By निखिल म्हात्रे | Published: February 23, 2024 3:28 PM

Raigad News: ग्रामीण भागात वाढत्या आधुनिकीकरणातून अनेक हायटेक बदलांना सुरुवात झाली आहे. शासकीय योजनांचा लाभ असो की शालेय शिक्षण, आरोग्य व्यवस्था अगर बाजारातील जीवनावश्यक वस्तूंची खरेदीसाठी आता सगळीकडे कॅशलेस व्यवहाराला अधिक पसंती देण्यात येत आहे.

- निखिल म्हात्रेअलिबाग - ग्रामीण भागात वाढत्या आधुनिकीकरणातून अनेक हायटेक बदलांना सुरुवात झाली आहे. शासकीय योजनांचा लाभ असो की शालेय शिक्षण, आरोग्य व्यवस्था अगर बाजारातील जीवनावश्यक वस्तूंची खरेदीसाठी आता सगळीकडे कॅशलेस व्यवहाराला अधिक पसंती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही ऑनलाईन क्यूआर कोडची चलती आहे.

शहरातील बाजारापेठांत इलेक्ट्रॉनिक साधने उपलब्ध झाली आहेत. आता ग्रामीण भागातही मोबाईल, इंटरनेटने वेग पकडल्यामुळे शहरी भागातील डिजिटल रुपया आता ग्रामीण भागातही चांगलाच स्थिरावला आहे. आता पैसे खिशात ठेवून दुकानात जाण्याची मुळीच गरज नाही. अगदी दूधवाला, भाजीवाला, राशन दुकानदारांकडेही क्यूआर कोड उपलब्ध आहे. गेल्या दोन वर्षांत ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पूर्वीच्या तुलनेत सध्या ऑनलाईन व्यवहारावरच सर्वाधिक भर दिला जात आहे. त्यामुळे सध्या रोखीचे व्यवहार कमी झाले आहेत. संसारोपयोगी साहित्य, खाद्यपदार्थ, भाजीपाला, फेरीवाल्याकडील खाऊ घ्यायचा असला तरी क्यू-आर कोड स्कॅन केला जात आहे. रोखीने होणाऱ्या व्यवहारांचे प्रमाण 40 टक्के असून आता खिशात नव्हे; तर बँकेच्या खात्यात पैसा असायला हवा, अशी अवस्था निर्माण झाली आहे. खबरदारी बाळगणे गरजेचे ऑनलाईन व्यवहाराला चालना देण्याची घोषणा शासनस्तरावरून करण्यात आली. सुरुवातीच्या काळात प्रशासकीय पातळीवरून युद्धस्तरावर जनजागृती करण्यात आली. नागरिकांनाही त्याचे महत्त्व पटले असून सध्या रोखीच्या व्यवहारांचे प्रमाण झपाट्याने घटून डिजिटल पेमेंटला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे; परंतु नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करत असताना पुरेपूर खबरदारी बाळगायला हवी, असे आवाहन पोलिस प्रशासन व बँकांद्वारे केले जात आहे. भाजीपाला, किराणा, बेकरी विक्रेताही हायटेक केवळ मोठे दुकानदारच नव्हे; तर चक्क पाणीपुरी, समोसा अन्‌‍ कचोरी विकणाऱ्यांनीही ग्राहकांच्या सोयीसाठी क्यूआर कोड उपलब्ध करून दिले आहेत. यासह भाजीपाला विक्रेत्यांनाही ऑनलाईन पेमेंट ट्रान्सफरचा पर्याय खुला करून देण्यात आला आहे. त्यामुळे सर्वत्र कॅशलेस व्यवहार पहायला मिळत आहे. सुरुवातीला आम्ही वस्तूच्या बदल्यात वस्तू अगर त्याबदल्यात एखादे काम या पद्धतीने व्यवहार करीत असायचो, असे माझे आजोबा सांगायचे; परंतु आता कॅशलेस व्यवहार प्रक्रिया आल्याने साध्या दुकानापासून ते मोठ्या दुकानदाराकडेदेखील क्यूआर कोड वापरून व्यवहार केले जातात.- दिशा पाटील, गृहिणी.

टॅग्स :onlineऑनलाइनRaigadरायगड