शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
4
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
5
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
6
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
7
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
8
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
9
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
10
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
11
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
12
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
13
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
14
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
15
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
16
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
17
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
18
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
19
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही
20
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला

रायगडमध्ये पहिल्याच पावसाने घेतले दोन बळी; रायगडावर दगड पडून पुण्यातील शिवभक्ताचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2023 9:48 AM

मान्सूनपूर्व पावसाने रविवारी रायगड जिल्ह्यात काही भागांत हजेरी लावली.

लोकमत न्यूज नेटवर्क, खोपोली / महाड : मान्सूनपूर्व पावसाने रविवारी रायगड जिल्ह्यात काही भागांत हजेरी लावली. मात्र, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने दोघांचा मृत्यू झाला आहे. खालापुरात नदीकाठी मासेमारी करताना झाड पडल्यामुळे भगवान जाधव या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर  एक मुलगी जखमी झाली, तर रायगड पाहून पायऱ्या उतरणाऱ्या तरुणावर घरंगळत आलेला दगड पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. हा तरुण पुणे येथून शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आला होता. मृत तरुणाचे नाव प्रशांत गुंड (वय २८) असे आहे.  

खालापुरात नदीकाठी मासेमारी करताना झाड पडल्यामुळे भगवान जाधव या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर खोपोली नगर परिषद हद्दीतील वासरंग येथे झाड पडल्यामुळे एक मुलगी जखमी झाली आहे. तिला एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी किल्ले रायगड परिसरात वादळी वारा झाला. त्याचबरोबर जोरदार पाऊसदेखील पडला. या वादळी पावसामुळे शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्त उभे केलेले तात्पुरते निवारा शेड, स्वच्छतागृह, नियंत्रण कक्ष, तंबू हवेत उडून गेले. याचदरम्यान किल्ले रायगड उतरत असणाऱ्या एका तरुणावर वरून घरंगळत आलेल्या दरडीतील एक दगड अंगावर कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला. प्रशांत गुंड व त्याचा मित्र असे दोघेजण शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आले होते. 

पालघरमध्ये रविवारी सकाळी ठिकठिकाणी सुमारे अर्धा तास मान्सूनपूर्व पाऊस झाला. मुरबाड आणि शहापूर तालुक्यांतील काही भागात रविवारी पावसाचा शिडकावा झाला. भिवंडीत पडघा येथे दुपारी थाेडासा पाऊस झाला. तर ठाणे शहर परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण हाेते. शहापूर तालुक्यात दुपारपासूनच वासिंद, कसारा, आटगाव, भातसानगर, डोळखांब, किन्हवली पट्ट्यासह शहापूरमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या.

 

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशलRaigadरायगडRainपाऊस