Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 20:46 IST2025-05-06T20:46:26+5:302025-05-06T20:46:26+5:30
Raigad Mangavad Accident: रायगड जिल्ह्यामधील माणगावध्ये विचित्र अपघात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.

Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
रायगड जिल्ह्यामधील माणगावध्ये विचित्र अपघात घडला. भरधाव टेम्पोने सायकलसह दोन वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली असून पोलीस तपासाला सुरुवात केली. या अपघातात मरण पावलेल्यांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
रायगडमधील मोर्बा-माणगाव मार्गावर हा भीषण अपघात झाला, जिथे भरधाव टेम्पोने सायकल, पोलीस जीप आणि एका दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय, वाहनांचेही प्रचंड नुकसान झाले. दिनेश शेलार, विजया शेलार आणि वामन पवार अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला? याचाही पोलीस शोध घेत आहेत.