Raigad: जेएनपीएच्या पीयूबी बिल्डिंगच्या समोरच्या रस्त्यावर, केमिकलने भरलेला टॅकर पलटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 19:56 IST2024-06-27T19:55:58+5:302024-06-27T19:56:18+5:30
Raigad News: जेएनपीए बंदरातून फॉस्फरीक ॲसिड वाहून नेणारा टॅकर गुरुवारी दुपारी पोर्ट यूजर बिल्डिंगच्या समोरच्या रस्त्यावर अचानक पलटी झाला.केमिकलने भरलेला टॅकर रस्त्यावरच पलटी झाल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून या मार्गावरील कंटेनर वाहतूक सुमारे तासभर रोखुन ठेवण्यात आली होती.

Raigad: जेएनपीएच्या पीयूबी बिल्डिंगच्या समोरच्या रस्त्यावर, केमिकलने भरलेला टॅकर पलटी
- मधुकर ठाकूर
उरण - जेएनपीए बंदरातून फॉस्फरीक ॲसिड वाहून नेणारा टॅकर गुरुवारी दुपारी पोर्ट यूजर बिल्डिंगच्या समोरच्या रस्त्यावर अचानक पलटी झाला.केमिकलने भरलेला टॅकर रस्त्यावरच पलटी झाल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून या मार्गावरील कंटेनर वाहतूक सुमारे तासभर रोखुन ठेवण्यात आली होती.सुदैवाने वाहनचालक जखमी झाला आहे. मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
गुरुवारी दुपारच्या सुमारास जेएनपीए बंदरातील गणेश बॅन्जो प्लास्ट या रासायनिक कंपनीतुन फॉस्फरीक ॲसिड भरलेले टॅकर तळोजातील दिपक फर्टिलायझर कंपनीकडे निघाला होता.पीयुबी बिल्डिंग नजीकच्या उड्डाणपूला जवळील वळणावर येताच वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर रस्त्यावरच पलटी झाला.यामध्ये वाहनचालक सुभाष शिवाजी गोरे जखमी झाला आहे.सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसल्याची माहिती न्हावा-शेवा बंदर पोलिसांनी दिली.
दरम्यान, फॉस्फरीक ॲसिड भरलेला ट्रॅकर वर्दळीच्या रस्त्यावरच पलटी झाल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून काही तास या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.तासाभराच्या प्रयत्नांने पलटी झालेला टॅकर क्रेनच्या सहाय्याने व वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला सारून ठेवण्यात आला असल्याची माहिती न्हावा-शेवा बंदर वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी.एम.मुजावर यांनी दिली.तर या फॉस्फरीक ॲसिड ज्वलनशील नसुन यांचा वापर खत निर्मितीसाठी केला जात असल्याची माहिती गणेश बॅन्जो प्लास्ट कंपनीचे अधिकारी संदेश म्हात्रे यांनी दिली.