शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
5
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
6
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
7
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
8
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
9
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
10
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
11
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
12
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
13
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
14
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
15
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
16
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
17
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
18
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
19
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
20
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या

रेल्वेस्थानकात सुविधांची वानवा

By admin | Updated: October 19, 2015 01:19 IST

महाड तालुक्यातील खाडीपट्टी विभागातील वामणे - सापे रेल्वे स्थानकात प्रवाशांना कोणतीच सुविधा नाही, तसेच निवारा शेड नसल्याने पावसाळ्यात भिजत तर ऊन्हात तापत

दासगांव : महाड तालुक्यातील खाडीपट्टी विभागातील वामणे - सापे रेल्वे स्थानकात प्रवाशांना कोणतीच सुविधा नाही, तसेच निवारा शेड नसल्याने पावसाळ्यात भिजत तर ऊन्हात तापत या रेल्वे स्थानकात उभे राहावे लागत आहे, तसेच येथे बसण्याची कोणती सुविधा नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, स्वच्छालय नाही, यामुळे या ठिकणाहून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे या गैरसोर्इंकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.महाड तालुक्यातील वामणे - सापे हे रेल्वे स्थानक खाडीपट्टी विभागातील म्हत्वाचे स्थानक आहे. या स्थानकावरून गोठे, रावढल, तुडील, खुटील, नरवण, वामणे, सापे, नडगाव, म्हाप्रल, मंडणगड, आंबेत, या अनेक गावातून नागरिक कोकण रेल्वेचा प्रवास करतात. या सर्व गावांना हेच जवळचे स्थानक आहे. या स्थानकावरून दरदिवशी या गावातील शेकडो नागरिक रेल्वेने ये - जा करत आहेत. कोकण रेल्वेने ज्या वेळी कोकणात सुरुवात केली त्यावेळी वीर स्थानक व करंजाडी या मधल्या टप्प्यात रेल्वेचे स्थानकच नव्हते. या खाडी पट्यातील नागरिकांना रेल्वे मार्गाने प्रवास करावयाचा असेल तर विर स्थानकात किंवा करजाडी स्थानकात जावे लागत असे. याचा विचार करत या विभागातील ३० गावांची मनसुर इब्राहीम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली खाडीपट्टा एकता रेल्वे संघर्ष समिती तयार करण्यात आली. व या खाडी पट्टा विभागात रेल्वेचे स्थानक व्हावे यासाठी आंदोलन करण्यात आले. नागरिकांचा विचार करत १२ वर्षापूर्वी कोकण रेल्वे प्रशासनाने वामणे सापे स्थानक तयार केले. या ठिकाणी कोकण रेल्वेच्या दोन गाड्यांना थांबा देऊन या विभागातील रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर केली.कोकण रेल्वेने या ठिकाणी स्थानक दिले. थांबा दिला मात्र निवारा शेडची काही सोय नाही. प्रवाशांना बसण्याचे आसन नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, वॉचमॅन नाही यामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आहे. तसेच तिकीट घरदेखील नाही या ठिकाणी खाजगी व्यक्ती कमिशनवर प्रवाशांची गैर सोय होऊ नये म्हणून हे काम करत आहे.या अगोदर या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विर किंवा करंजाडी स्थानकता तिकीटसाठी जावे लागत होते. सध्याच्या स्थितीत या वामणे - सापे स्थानकावर खाडीपट्टी विभागातील दरदिवशी शेकडो प्रवासी रेल्वेने ये - जा करीत आहेत. मात्र या ठिकाणी या स्थानकात होणाऱ्या गैरसोई बद्दल रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी आहे. रेल्वे प्रशासनाने वामणे - सापे या स्थानकात होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)