शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

उल्हासनदी प्रदूषित होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 1:31 AM

लब्धी गार्डन प्रकल्पाबाबत तक्रार : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास पत्र

कांता हाबळे

नेरळ : कर्जत येथून वाहत नेरळकडे येत असताना दहिवली गावाजवळ उल्हासनदीच्या तीरावर असलेले लब्धी गार्डन प्रदूषित पाणी सोडत असल्याची तक्रार उल्हासनदी बचाव मोहिमेचे कार्यकर्ते केशव बबन तरे यांनी लेखी पत्र देऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी, नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग रायगड, तहसीलदार यांच्याकडे केली आहे. दरम्यान, त्या ठिकाणी जमीन विकसित करीत असलेल्या विकासकाने आपल्या सोसायटीमधील एक लीटर पाणीदेखील उल्हासनदीमध्ये जाणार नाही याची काळजी घेण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उल्हासनदी प्रदूषणाचा विषय सध्यातरी सुटला आहे.

लब्धी गार्डन्स हा रहिवासी प्रकल्प नेरळपासून चार कि.मी. अंतरावर उल्हासनदीच्या किनारी दहिवली गावाजवळ साधारणत: दहा एकरमध्ये बांधण्यात आला असून, सद्यस्थितीत पाच फेजमध्ये ५०० कुटुंब या ठिकाणी स्थायिक होणार आहेत. ५०० कुटुंबीय म्हणजे अंदाजे २५००-३००० लोकसंख्या नव्याने राहायला येऊ शकते. हा प्रकल्प बारमाही वाहती असलेल्या उल्हासनदीच्या पात्रापासून हाकेच्या अंतरावर असून या रहिवासी संकुलातील सांडपाण्याचा प्रश्न येथील स्थानिक रहिवासी म्हणून ही गंभीर बाब आम्हाला वाटत आहे. कारण, हे सांडपाणी उल्हासनदीत सोडण्याचा प्रयत्न लब्धी गार्डन या विकासकाकडून सुरू आहे. दहिवली गावापासून ते नदीपर्यंतच्या सर्व जागेवर लब्धी गार्डन या विकासकाद्वारे व्यावसायिक दृष्टिकोनातून गृहप्रकल्प उभा केला जात आहे, असे के शव तरे यांनी सांगितले.पूर्वी या संकुलालगत एक नैसर्गिक ओढा होता जो शेती आणि गावातील गोळा होणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा नदीपात्रात वाहून नेत होता; परंतु आता या ओढ्याच्या अर्ध्या भागात संरक्षण भिंत बांधली असून तो अरुंद करण्यात आला आहे, तसेच संकुलातील सांडपाण्याला वाट करून देण्यासाठी दोन मोठ्या भूमिगत पाइपलाइन टाकल्या असून, संकुलातील सांडपाणी या ओढ्यात सोडले जाणार असून पुढे ते पाणी ओढ्या मार्गाने नदीत मिसळणार आहे. पावसाच्या पाण्याच्या आडून हे सांडपाणी ग्रामीण भागातील जनतेच्या पाण्यात विरजणच असणार आहे. ही बाब अतिशय गंभीर असून कोणत्याही नियमांचे पालन न करता हा प्रकार सुरू असून, हा प्रकार निदर्शनास आणण्याचा प्रयत्न तक्रारकर्ते केशव तरे यांनी केला आहे. आजघडीला या नदीमुळे जवळपास ४८ गावांना पिण्याच्या पाण्याचे एकमेव साधन असताना जर हे सांडपाणी नदीमध्ये सोडले तर बारमाही वाहती नदी दूषित होऊ शकते. असे असताना आज कर्जत-नेरळ परिसरात नदीकिनारी सुरू असलेले रहिवासी संकुल नदीचे आकर्षण दाखवून ग्राहकांना आकर्षित करत असून कालांतराने या नैसर्गिक स्रोताचीही विदारक अवस्था होण्यास विलंब लागणार नाही.लब्धी गार्डन या विकासकाने संकुलातील सांडपाणी पाइपलाइनद्वारे ओढ्यात सोडून ते पुढे नदीला मिळणार अशी व्यवस्था करत, कायदा हातात घेऊन नैसर्गिक स्रोत दूषित करण्याचा डाव असून तो वेळीच थांबला पाहिजे, अशी मागणी केली आहे. कायद्यानुसार नदीपात्रालगत जे रहिवासी अथवा बांधकाम होत आहे त्यांच्या सांडपाण्याची व्यवस्था ही अंतर्गत असावी, हा नियम आहे.आम्ही आमच्या प्रकल्पात सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प तयार केला आहे. आमच्या सोसायटीमधील एक लीटर पाणीदेखील आम्ही बाहेर सोडत नसून पाच लाख लीटर क्षमता असलेला हा प्रकल्प आहे. दुसरीकडे आमच्या येथे केवळ १०० कुटुंब राहत आहेत. त्याच वेळी सर्व ५०० कुटुंब राहायला आली तरी एक थेंब पाणी बाहेर सोडले जाणार नाही. दुसरीकडे ज्या उल्हासनदीमध्ये पाणी सोडले असा गैरसमज केला जात असून, आम्हीदेखील त्याच उल्हासनदीचे पाणी पितो मग तेथेच कसे काय सांडपाणी सोडणार? सध्या आम्ही प्रक्रिया केलेले पाणी बगिचा आणि बांधकामासाठी वापरत आहोत.- विकास जैन,संचालक, लब्धी गार्डनआमचे एकमेव पाण्याचे साधन असलेली नैसर्गिक संपदा म्हणून उल्हासनदी असताना ती दूषित करण्याचा जो डाव आहे तो विकासकाने वेळीच थांबवावा, तसेच प्रत्येक नागरिकाने, तरुणांनी आपल्या आजूबाजूला जागरूकतेने लक्ष ठेवून असे प्रकार निदर्शनास आणले पाहिजेत. आम्ही या संदर्भात पत्र पाठवून संबंधित विभागास तक्रार केली आहे, अपेक्षा आहे की यावर वेळीच योग्य ती कारवाई करून हा प्रकार थांबविला पाहिजे.- केशव तरे, माजी अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती 

टॅग्स :Raigadरायगडraigad-pcरायगडriverनदी