शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

काळी जादू करण्याच्या प्रयत्नात असणारे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 23:14 IST

येथील वरसोली गावातील स्मशानभूमीत जळत्या प्रेताजवळ काळी जादू करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांना पोलिसांनी एका मांत्रिकासह त्याच्या पाच साथीदारांना ताब्यात घेतले आहे.

अलिबाग : येथील वरसोली गावातील स्मशानभूमीत जळत्या प्रेताजवळ काळी जादू करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांना पोलिसांनी एका मांत्रिकासह त्याच्या पाच साथीदारांना ताब्यात घेतले आहे. ग्रामस्थांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ उदबत्त्या, करवंटी, लिंबू, दारूच्या बाटल्या, मेणबत्त्या, भात, शिजवलेले तयार मटण, पत्रावळी अशा वस्तू आढळल्या आहेत. अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रि या रात्री उशिरापर्यंत सुरू होती.वरसोली गावातील ग्रामस्थ राकेश घरत यांची पत्नी वैभवी घरत हिचे २८ डिसेंबर रोजी निधन झाले. त्यानंतर ग्रामस्थांनी राकेश यांच्या पत्नीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी रात्रीच्या सुमारास वरसोली येथील स्मशानभूमीत आणून त्यावर अंत्यसंस्कार केले. त्याच वेळी स्मशानभूमीच्या बाहेर काही अज्ञात व्यक्ती होत्या. त्यातील काही जण स्मशानभूमीत डोकावून पाहत होते, या बाबत ग्रामस्थांनी त्यांना हटकले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.त्यांचा संशय आल्याने ग्रामस्थांनी त्यांना पकडून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे वरील वस्तू सापडल्या. याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता जेवण करण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. जेवणासाठी तुम्हाला दुसरीकडे जागा नव्हती काय? असा प्रतिप्रश्न केल्यावर ते चांगलेच घाबरले. त्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना फोन करून बोलवले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्या पाच जणांना ताब्यात घेतले.गावातील एक महिला आजारी असल्याने स्मशानभूमीत उतारा काढायला आलो होतो, असे त्यांनी पोलिसांना सांगितल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकाराबाबत वरसोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच हर्षल नाईक यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात लेखी तक्र ार केली.ग्रामस्थ म्हणतात...एक सवाशिण महिला मरण पावल्यानंतर तिच्या देहातील एखादे हाड काळी जादू करण्यासाठी वापरले जाते, असे ग्रामस्थांकडून बोलले जाते. त्यासाठीच त्या व्यक्ती स्मशानभूमीत आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी