शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

'दत्तक घेतलेलं गाव मोदींना नीट करता आलं नाही, ते देशाचं काय भलं करणार?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 21:10 IST

स्वतः जे गाव दत्तक घेतलं ते जर तुम्ही नीट करू नाही शकलात तो माणूस ह्या देशाचं काय भलं करणार ? असा प्रश्न करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींनी दत्तक घेतलेल्या गावाचा व्हिडीओ लोकांसमोर दाखविला.

महाड - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदार म्हणून जे गाव दत्तक घेतलं त्यात काहीच घडलं नाही. गावात एकही सुविधा आली नाही. साधे नाले साफ नाही होऊ शकले ना महाविद्यालय ना दवाखाना आहे.  स्वतः जे गाव दत्तक घेतलं ते जर तुम्ही नीट करू नाही शकलात तो माणूस ह्या देशाचं काय भलं करणार ? असा प्रश्न करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींनी दत्तक घेतलेल्या गावाचा व्हिडीओ लोकांसमोर दाखविला.

रायगड लोकसभा मतदारसंघातील महाडमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जाहीर सभा पार पडली या सभेमध्ये राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या योजनांवर टीका केली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी धसई गावाचा व्हिडीओ दाखवत देशातले धसई हे पहिलं कॅशलेस गाव आहे असं मोदींनी जाहीर केलं पण ह्या गावात एकच राष्ट्रीयकृत बँक आहे आणि ह्या गावात अनेकांचं बँक खातं नाही त्यामुळे त्यांचे सगळेच व्यवहार रोखीत होतात असा आरोप केला. 

नरेंद्र मोदींकडे दाखवण्यासारखं काहीच उरलं नाही त्यामुळे आता पुलवामात शहीद जवानांच्या नावावर मतं मागत आहे. आजपर्यंत कधीच झालं नाही, की पाकिस्तनाचा पंतप्रधान, भारताचा पंतप्रधान कोण असावा ह्यावर बोलत आहेत.काय कारण आहे की इम्रान खान ह्यांना मोदी भारताचे पंतप्रधान व्हावेत असं वाटतं? अशी शंका राज ठाकरे यांनी उपस्थित केली. 

अटलजींच्या काळात कारगिल झालं तरी..अटलजींच्या वेळेस पण कारगिल झालं होतं पण त्यांनी त्याचा कधी बाजार नाही मांडला जसा मोदी मांडत आहेत. जे जे १९३० ला हिटलरने जर्मनीत करायचा प्रयत्न केला तोच सगळा प्रकार नरेंद्र मोदी २०१४ पासून करायचा प्रयत्न करत आहेत. पण ते विसरले की सोशल मीडिया आता आहे जो तुम्हाला आरसा दाखवतो असा टोला राज यांनी लगावला. 

मेक इन इंडियावर टीकास्त्रवैमानिक अमोल यादवला मेक इन इंडियात पहिलं विमान बनविण्याचा व्यवसाय सुरु केला. महाराष्ट्र शासनाने त्याला पालघर येथे जमीन दिली. हा व्यवसाय सुरु करावा म्हणून महाराष्ट्र सरकारने वारेमाप आश्वासन दिली, शेवटी त्याला सरकारी यंत्रणेने इतकं जेरीस आणलं की हा मुलगा आता अमेरिकेत एका कंपनीबरोबर हा व्यवसाय सुरु करतोय अशी टीका राज यांनी केली. 

शिवसेना-भाजपा सत्तेसाठी लाचारशिवसेना-भाजपने एकमेकांना यथेच्छ शिव्या दिल्या आणि पुन्हा युती केली कारण दोन्ही पक्ष लाचार आहेत. पैसे आणि सत्ता ह्यासाठी ते वाट्टेल त्या तडजोडी करतील असा टोला शिवसेना-भाजपाला राज ठाकरेंनी यांनी लगावला तसेच  ही निवडणूक देशात लोकशाही टिकणार का हुकूमशाही येणार हे ठरवणारी आहे. म्हणून नरेंद्र मोदी आणि अमित शाह ह्यांना राजकीय क्षितिजावरून हटवण्यासाठी मतदान करा. मोदींना संजीवनी देतील अशा पक्षांनाही मतदान करु नका असं सांगत राज यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला मतदान करु नका असंही आवाहन लोकांना केलं.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRaj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाraigad-pcरायगडMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019