शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

शेकापचा तहसीलवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 1:05 AM

एमआयडीसीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून कुंडलिकेच्या तीरावरील २६ गावांसाठी नळपाणी योजना केली आहे; परंतु या योजनेवरून अनेकांनी अनधिकृत नळ

रोहा : एमआयडीसीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून कुंडलिकेच्या तीरावरील २६ गावांसाठी नळपाणी योजना केली आहे; परंतु या योजनेवरून अनेकांनी अनधिकृत नळ जोडण्या घेतल्याने भातसई विभागात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या विभागातील महिलांनी ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’ अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला. रोहा तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर जनतेच्या विविध प्रश्नांसाठी आ. पंडित पाटील व आ. धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.कुंडलिकेमध्ये सोडण्यात येणारे सांडपाणी खोल समुद्रात नेऊन सोडावे अशी आग्रही मागणी आ.पंडित पाटील यांनी केली, तर कंत्राटी कामगार पद्धत ही सामान्य कामगारांची पिळवणूक करणारी असल्याने ती बंद करण्यासाठी कालबद्ध कार्यक्र म आखण्यात यावा. स्थानिक तरुणांना त्यांच्या योग्यतेनुसार कायमस्वरूपी नोकºया देण्यात याव्यात आणि कोलाड विभागातील नादुरुस्त कालव्यांची कामे पूर्ण करून शेतकºयांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आ. धैर्यशील पाटील यांनी केली. धामणसई विभागात एमआयडीसीमार्फत स्वतंत्र पाणी योजना राबविण्यात यावी, असेदेखील सांगण्यात आले. हा मोर्चा तहसील कार्यालयाच्या गेटवर अडविण्यात आला. भविष्यात तहसील कार्यालयाच्या गेटवर मोर्चा अडविण्यात आल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारादेखील आ. धैर्यशील पाटील यांनी दिला आहे.या वेळी मोर्चेकºयांच्या शिष्टमंडळाबरोबर झालेल्या चर्चेत २६ गाव नळपाणी योजनेवरील बेकायदा नळजोडण्या १५ दिवसांत तोडण्यात येतील. तसेच औद्योगिक वसाहतीचे सांडपाणी खोल समुद्रात नेऊन सोडण्यासाठी मंत्री महोदयांबरोबर लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्याचे ठरविण्यात आले. त्याचप्रमाणे कंत्राटी कामगारांचा प्रश्न, स्थानिक तरुणांना नोकºया, सीएसआर निधीचे वाटप, मच्छीमारांची नुकसानभरपाई, एमआयडीसीलगत असणाºया गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न याबाबत लवकरच आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन रोहा इंडस्ट्रिज असोसिएशनकडून देण्यात आले आहे. शेतकºयांना भातविक्रीचे पैसे तातडीने मिळावेत, यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन उपविभागीय अधिकारी रवींद्र बोंबले, तहसीलदार सुरेश काशिद, तसेच सहायक पोलीस निरीक्षक येडे-पाटील यांनी दिले आहेत.या मोर्चात रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष आस्वाद पाटील, पंचायत समिती सदस्या गुलाब वाघमारे, ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर, तालुका चिटणीस राजेश सानप, जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य गणेश मढवी, अनंता वाघ, जिल्हा कामगार आघाडी सदस्य सुहास खरीवले, तालुका महिला आघाडी चिटणीस कांचन माळी तसेच तालुक्यातील सर्व विभागीय चिटणीस, शहर चिटणीस, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.मोर्चातील मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात यापेक्षा मोठा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शेकापच्या आमदारांनी प्रशासनाला दिला.