बेलापूर -नेरुळ- खारकोपरदरम्यान प्रवासी वाहतूक संध्याकाळी पाचनंतरच पूर्ववत सुरू होणार, जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 13:45 IST2023-02-28T13:43:51+5:302023-02-28T13:45:24+5:30
Kharkopar Local Accident : बेलापूर -नेरुळ- खारकोपर दरम्यान रुळावरून लोकल घसरल्याने या मार्गावरील बंद करण्यात आलेली प्रवासी वाहतूक किमान आज संध्याकाळी पाचनंतरच पुर्ववत सुरू होणार असल्याची माहिती सेंट्रल रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.

बेलापूर -नेरुळ- खारकोपरदरम्यान प्रवासी वाहतूक संध्याकाळी पाचनंतरच पूर्ववत सुरू होणार, जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली माहिती
- मधुकर ठाकूर
उरण - बेलापूर -नेरुळ- खारकोपर दरम्यान रुळावरून लोकल घसरल्याने या मार्गावरील बंद करण्यात आलेली प्रवासी वाहतूक किमान आज संध्याकाळी पाचनंतरच पुर्ववत सुरू होणार असल्याची माहिती सेंट्रल रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.
मंगळवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास बेलापूरहून खारकोपर स्टेशनला जाणाऱ्या लोकल ट्रेनचे तीन डब्बे खारकोपर स्टेशनमध्ये प्रवेश करताना रुळावरून घसरले आहेत.यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही इजा झालेली नाही. रिलीफ ट्रेन घटनास्थळी पोहचल्या असून रुळांवरून घसरलेले डबे हटविण्यात येत असुन गाड्यांची वाहतूक पूर्ववत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.दरम्यान बेलापूर -नेरुळ- खारकोपर या मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
साधारणपणे घसरलेले तीनही कोचेस ऑफ दि ट्रॅक करण्यात आल्यानंतच मार्गावरील रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.साधारणता संध्याकाळी पाचनंतरच प्रवासी वाहतूक पुर्ववत होईल असा अंदाज सेंट्रल रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी व्यक्त केला आहे.फक्त बेलापूर-नेरुळ- खारकोपर मार्गांवरील प्रवासी वाहतूकच बंद आहे. हार्बर , मेन लाईन आणि इतर मार्गांवरील वाहतूक सुरळीत सूरु आहे.