शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

परिचारिका केंद्रावर पालकांची धडक

By admin | Updated: August 27, 2015 23:15 IST

परिचारिका केंद्राच्या इमारतीच्या दुरवस्थेबाबत गुरुवारी पालकांनी हल्लाबोल केला. यानंतर विद्यार्थिनींच्या राहण्याची तातडीने पर्यायी व्यवस्था करण्यात येईल, असे लेखी आश्वासन

अलिबाग : परिचारिका केंद्राच्या इमारतीच्या दुरवस्थेबाबत गुरुवारी पालकांनी हल्लाबोल केला. यानंतर विद्यार्थिनींच्या राहण्याची तातडीने पर्यायी व्यवस्था करण्यात येईल, असे लेखी आश्वासन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाहुबली नागावकर यांनी दिले. त्यानंतर पालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.येथील परिचारिका केंद्राच्या इमारतीची दुरवस्था झाल्याने स्लॅब कोसळून एक विद्यार्थिनी जखमी झाली होती. परिचारिकेचे प्रशिक्षण घेणाऱ्या १०३ मुली जीव मुठीत घेऊन येथे वास्तव्य करीत असल्याबाबत लोकमतने उघड केले होते. वृत्त वाचून गुरु वारी विद्यार्थिनींच्या पालकांनी थेट परिचारिका केंद्राच्या इमारतीवर धडक दिली. पालकांनी तेथे एकच हल्लाबोल केल्याने तेथील सर्व आरोग्य विभागातील प्रशासकीय यंत्रणा हादरून गेली. इमारतीची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, दुरुस्तीच्या कालावधीत विद्यार्थिनींची राहण्याची पर्यायी व्यवस्था करावी, सुरक्षा रक्षक पुरवावा अशा विविध मागण्या पालकांनी केल्या.रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जिल्हा प्रशिक्षण केंद्र आणि बाह्य रुग्ण विभागाच्या दुसऱ्या मजल्यावर पर्यायी व्यवस्था करण्यात येईल, तेथे सुरक्षा रक्षकही पुरविण्यात येणार असल्याचे डॉ. नागावकर यांनी पालकांना लेखी लिहून दिले. (प्रतिनिधी)