पनवेल-पेण एसटीला अपघात! दुभाजकावरून पलिकडे जात जेएसडब्ल्यूच्या बसवर आदळली, चालक गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 13:05 IST2023-06-29T13:05:16+5:302023-06-29T13:05:53+5:30
शिरढोण येथील पुलावर हा अपघात झाला आहे. बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

पनवेल-पेण एसटीला अपघात! दुभाजकावरून पलिकडे जात जेएसडब्ल्यूच्या बसवर आदळली, चालक गंभीर
पनवेल-पेण एसटी बसला मुंबई-गोवा महामार्गावर आज भीषण अपघात झाला आहे. निसरड्या रस्त्यामुळे एसटी बस डिव्हायर ओलांडून पलिकडे गेली. याचवेळी समोरून जेएसडब्ल्यू स्टील कंपनीची बस येत होती तिच्यावर जाऊन आदळली. यामध्ये एसटी चालक गंभीर जखमी झाला आहे.
शिरढोण येथील पुलावर हा अपघात झाला आहे. बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रवाशांना नजिकच्या उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.
पावसाळा नुकताच सुरु झालेला आहे. यामुळे रस्त्यावरील माती, टायर घासून निर्माण झालेली धूळ आदी गोष्टी पुरेशा धुतल्या गेलेल्या नाहीत. यामुळे या काळात वाहने चालविताना वेगात असल्यास घसरण्याचे प्रकार घडत असतात. वाहन चालकांनी वाहने चालविताना ही काळजी घ्यावी.