शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

भातशेतीच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 02:54 IST

खांब कोलाड विभागातील उन्हाळी शेती ही डोलवहाळ येथील धरणाच्या पाण्यावर केली जाते.

रोहा : मे महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात तालुक्यातील खांब कोलाड विभागात भातशेतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. शेतकरी चांगले पीक येण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे. खांब कोलाड विभागातील उन्हाळी शेती ही डोलवहाळ येथील धरणाच्या पाण्यावर केली जाते.उन्हाळ्यात या भागातील नडवली, खांब, वैजनाथ, पुंगाव, मुठवली, शिरवली, पुई, गोवे, कोलाड, महादेववाडी, चिंचवली, तिसे आणि तळवली या गावांतील शेतकºयांना धरणाचे मुबलक पाणी मिळत असल्याने उन्हाळी शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते.खांब कोलाड विभागातील शेतकºयांनी या वर्षीही लवकर तयार होणाºया बी-बियाण्यांची लावणी केली आहे. लवकर तयार होणाºया भातशेतीमध्ये रत्ना, कोलम, कलिंगड, रूपाली या बियाणांचा समावेश होतो. तर उशिरा येणाºया भाताच्या जातीमध्ये जया, आयराट या बियाण्यांचा समावेश आहे. रोह्यातील पोहा हा संपूर्ण भारत देशात प्रसिद्ध मानला जातो. पोहा बनविण्यासाठी जया, आयराट या जातीचा जास्त वापर होत असतो.गेली सहा वर्षे कालव्याला पाणी येत नसल्याने रोहा तालुक्यातील ३० टक्के शेती ही कालव्याच्या पाण्यावर केली जात आहे. त्यामुळे उत्पादन कमी असल्याने या वर्षी तरी भाताला क्विंटलमागे २००० इतका हमीभाव मिळेल, या आशेवर शेतकरी आहेत. यावर्षी २००० ते २२०० इतका भाव मिळेल, अशी अपेक्षा येथील शेतकरी व्यक्त करीत आहे. याचप्रमाणे यंदा शेतकºयांना चांगला हमीभाव द्यावा, अशी मागणी येथील स्थानिक शेतकरी संघटनांकडून होत असून दुबार पीक शेतकºयांसाठी वरदान ठरत आहे.माणगाव तालुक्यामध्ये भातकापणीला वेगलोकमत न्यूज नेटवर्कमाणगाव : माणगाव तालुक्यामध्ये दुबार भातशेती कापणीला वेग आल्याने शेतकºयांची लगबग सुरू झाली आहे. माणगाव तालुक्यात कालव्यातून मिळणाºया पाण्यामुळे शेतकरी दुबार भातशेती करू लागले आहेत. तालुक्यातील अनेक गावांत कालवे तयार करण्यात आल्याने शेतीला त्याचा फायदा होत आहे. माणगावमध्ये एकूण ३३०० हेक्टर क्षेत्रावर भात पीक घेण्यात आले आहे. यात जया, रत्ना, सुवर्णा, कर्जत-५, इ. वाणांची लागवड उन्हाळी हंगामामध्ये करण्यात आली आहे. साधारणत: ही लागवड जानेवारी महिन्यात केली जात असून, सध्या भातशेती कापणी वेगाने चालू आहे. आठ दिवसांत कापणी पूर्ण होईल. उन्हाळी भात पिकाचे ४५ क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादन येते, या हंगामातील भातशेतीवर कमी प्रमाणामधे कीड व रोगाचा प्रार्दुभाव आढळून येतो. उन्हाळी भात उत्पादनवाढीसाठी कृषी विभागाकडून विविध प्रशिक्षण, अभ्यासदौरे व चर्चासत्रांचे नियोजन केले होते. माणगाव तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी पी. बी. नवले यांनी दुबार पीक घेणाºया शेतकºयांना वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी