शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 00:58 IST

केंद्राची मान्यता : २७२ बेड्सना होणार पुरवठा; काम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाबाधितांचे रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांमधील बेड व्यवस्था अपुरी पडली आहे. सुदैवाने रुग्णांना आवश्यक असणारा प्राणवायूचा पुरवठा मुबलक आहे. या ऑक्सिजन पुरवठ्यामध्ये आता अधिक वाढ होणार आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यासाठी केंद्राने मान्यता दिली आहे. ४० लाख रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या या प्लांटमुळे रुग्णालयात प्राणवायूची गरज असणाऱ्या २७२ बेड्सना ऑक्सिजन पुरवठा होणार आहे.जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे ऑक्सिजन पुरवठा नियमित आणि सुरळीत सुरू आहे. सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयाला १८ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भागविली जाईल इतका ऑक्सिजन साठा मिळतो आहे. जिल्ह्यातील खोपोली आणि महाड येथील कंपन्यांमधून ऑक्सिजन पुरवठा करणारे सिलिंडर मागणीनुसार उपलब्ध होत आहेत. हा ऑक्सिजनचा पुरवठा रुग्णांना बेड जवळ सिलिंडर नेऊन दिला जातो. त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयात असणाऱ्या एक ऑक्सिजन जनरेशन प्लांटमधून ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. हा ऑक्सिजन पुरवठा थेट पाइपलाइनद्वारे रुग्णांच्या बेडपर्यंत नेण्यात आला आहे.कोरोना रुग्णांची होणारी वाढ आणि ऑक्सिजनची गरज पाहता केंद्र सरकारने जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यास मान्यता दिली आहे. राष्ट्रीय आपत्तीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालयाच्या आवारात हा प्लांट उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

केंद्राकडून प्राप्त झालेल्या निधीतून २ एअर ड्रायर मशीन , २ स्टोरेज टॅंक आणि १ एअर रिसिव्हर टॅंक मशीन रुग्णालयात दाखल झाली आहे. ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यासाठी अपेक्षित असणारी साधनसामग्री मागविण्यात आली आहे. तज्ज्ञ अभियंता वर्ग या प्लॅन्टचे काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या ऑक्सिजन जनरेशन प्लांटमधून ४० जम्बो सिलिंडर ऑक्सिजननिर्मिती केली जाणार आहे. ३०० एलपीएम ऑक्सिजन साठा या ऑक्सिजन प्लांटमधून केला जाणार आहे.

जिल्हा रुग्णालयास आवश्यक असणारी ऑक्सिजनची गरज भागविण्याइतका ऑक्सिजन साठा रुग्णालयात शिल्लक आहे. काही ऑक्सिजन प्लांटमधून निर्मित केला जातो. काही ऑक्सिजन खोपोली आणि महाड येथून येत आहे. नव्याने सुरू होणाऱ्या ऑक्सिजन जनरेशन प्लांटमधून जिल्हा रुग्णालयाच्या गरजेपेक्षा अधिक ऑक्सिजन तयार केला जाणार आहे. लवकरच हा प्लांट पूर्णत्वास येऊन सुरू करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.- डॉ. सुहास माने, जिल्हा शल्य चिकित्सक 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या