शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मापगाव येथे अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 00:55 IST

अलिबाग तालुक्यातील घटना : जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उज्ज्वला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे बालविवाह थांबविण्याबाबतची यशस्वी कार्यवाही करण्यात आली.मापगाव येथे बालविवाह होत असल्याची माहिती चाईल्ड लाईनच्या माध्यमातून मिळाल्यावर प्रत्यक्ष गावात भेट देऊन एकूण चार बालकांचे बालविवाह होत असताना बालकांचे आई-वडील व नातेवाइकांना समज देत त्या सर्वांचे समुपदेशन करण्यात आले. मापगाव येथील रहिवासी असलेली भावंडे, त्यापैकी एका मुलीचे वय १६ वर्षे व मुलाचे वय १९ वर्षे होते. मुलीचा विवाह निश्चित करण्यात आलेल्या मुलाचे वय १९ वर्षे व मुलाचा विवाह निश्चित करण्यात आलेल्या मुलीचे वय १७ वर्षे इतके होते. हे सर्वजण पोयनाड नागझरी आदिवासी वाडी येथील रहिवासी आहेत. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अन्वये अल्पवयीन बालकांचे बालविवाह होणार नाही, याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या असून, पालकांकडून जबाबनामा लिहून घेऊन पालकांना समज देण्यात आली आहे. 

अल्पवयीन बालकांना बाल कल्याण समितीसमोर उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या. यावेळी मापगाव येथील पोलीस पाटील अपेक्षा टुळे, अलिबाग पोलीस स्टेशनमधून मिनल मगर, जिल्हा परिविक्षा अधिकारी एस. एम. वाघमारे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुजाता सपकाळ, समुपदेशक अजिनाथ काळे, क्षेत्रीय कार्यकर्ता दशरथ चौधरी, संदीप गवारे, चाईल्ड लाईन प्रतिनिधी अमोल जाधव, सखी वन स्टॉप सेंटरच्या प्रतिनिधी मोहिनी रानडे, प्रशांत घरत, आदी उपस्थित होते. या प्रकरणी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुजाता सपकाळ यांनी गाव बाल संरक्षण समिती सदस्य व आई-वडिलांना मार्गदर्शन केले तसेच त्यांचे समुपदेशन करून त्यांना समजही देण्यात आली.