शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

रायगडमध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 5:35 AM

रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने कारखाने उभे राहिले आहेत. त्यामध्ये केमिकल कंपन्यांचाही अधिक भरणा आहे.

आविष्कार देसाई अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने कारखाने उभे राहिले आहेत. त्यामध्ये केमिकल कंपन्यांचाही अधिक भरणा आहे. येथील औद्योगिक वसाहतींमध्ये अधून-मधून स्फोट होऊन त्यामध्ये आतापर्यंत शेकडो निष्पाप कामगारांना आपला प्राण गमवावा लागला आहे. सातत्याने असे अपघात होत असल्याने जखमींवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यामध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध नाही. त्यामुळे मुंबईमध्ये उपचारासाठी जाण्यावाचून कोणताच पर्याय नसल्याने लवकरच अशी सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी जोर धरत आहे.माणगाव तालुक्यातील क्रिप्टझो कंपनीमध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण स्फोटामध्ये १८ कामगार जखमी झाले आहेत. त्यांच्यावर माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरु करण्यात आले होते. त्यापैकी आठ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना एमजीएम आणि जेजे रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. माणगाव ते नवीमुंबई असा प्रवास या गंभीर रुग्णांना करावा लागला आहे.जिल्ह्यातीलरस्त्यांची आधीच दैना उडाली आहे. त्यामुळे त्याचा प्रवास किती वेदनादायक असेल याचा विचारच न केलेला बरा.जिल्ह्यामध्ये जिल्हा सरकारी रुग्णालय आहे. मात्र, त्यामध्ये पुरेशा सोयी-सुविधांचा अभाव आहे. तसेच डॉक्टरांचीही कमतरता असल्याने या ठिकाणी उपचार घेता येत नाहीत. जिल्ह्यामध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारावे, अशी बऱ्याच वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र, त्याकडे प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सरकार सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याने रायगडकरांची ही मागणी अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. महाड येथे ट्रामा केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे. मात्र, तेथेही पुरेसे तज्ज्ञ, मनुष्यबळ आणि सुविधांअभावी ते बंद पडलेले आहे. रोहा, माणगाव आणि महाड विभागामध्ये कंपन्याचे जाळेपसरलेले असल्याने कंपन्यांमध्ये अपघात होतच असतात. तसेच महामार्गावर होणाºया जखमींवर तातडीने उपचार मिळावेत, त्यासाठी महाड तालुक्यामध्ये ट्रामा केअर सेंटर उभारण्यात आले होते. तेही बंद असल्याने शुक्रवारी झालेल्या स्फोटामध्ये जखमी झालेल्यांना मुंबई आणि नवी मुंबईला अधिक उपचारासाठी हलवण्याची वेळ आली आहे.जिल्ह्यामध्ये कंपन्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्या सीएसआर फंडातून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल का उभारले जात नाही, असाही प्रश्न आहे. कारण येथीलच जमिनी घेऊन कंपन्या उभारण्यात आल्या आहेत. कंपन्यांचे उत्तरदायित्व म्हणून जिल्हाधिकारी यांनी यामध्ये पुढाकार घेऊन, असे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.>अचानक झाला स्फोटमाणगावमध्ये असलेली क्रिप्टझो ही कंपनी आग विझवण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणे तयार करते. ती गॅसच्या साहाय्याने तयार केली जातात. शुक्रवारी दुपारी सुमारे ४.३० वाजता या कंपनीमध्ये या सिस्टीमचा डेमो करीत असताना अचानक स्फोट झाला, आग वाढून ती डेमो केलेल्या खोलीच्या बाहेर आली आणि बाहेर उभे असलेले कामगार भाजले गेले.>मांडवा ते मुंबई मार्गावर बोट रूग्णवाहिका सुरू करणारमाणगावमधील कंपनीमध्ये झालेला अपघात भीषण आहे. त्यातील जखमींना अधिक उपचारासाठी मुंबई, नवी मुंबई येथे हलवावे लागत आहे. वास्तविकपणे जिल्ह्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होणे गरजेचे आहे. नागोठणे येथे जागेची पाहणी करण्यात आली आहे. मात्र, त्याला पाहिजे तशी गती मिळालेली नाही, असे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. रस्त्यावरील प्रवास खडतर आणि अधिक वेळ घेणारा असल्याने मांडवा ते मुंबई या मार्गावर बोट रुग्णवाहिका सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पाच कोटी रुपयांचा खर्च आहे. कंपन्यांच्या सीएसआर फंडातून तो उभारण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी सरकारकडील निधी आणि कंपन्यांच्या सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करण्याबाबतची चांगली सूचना आहे. लवकरच याबाबत कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात येईल, असेही सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.>एकूण १८ कामगार जखमी आहेत, आठ जण गंभीररीत्या भाजले आहेत. त्यांना मुंबई आणिनवी मुंबई येथील रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे, तर उर्वरित जखमींवर माणगाव रुग्णालयात उपचार सुरू आहेत.- अनिल पारस्कर,जिल्हा पोलीस अधीक्षकरायगड जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये स्वतंत्र कार्यालय नाही, तसेच प्रदूषण महामंडळाचे कार्यालयही नाही. तसेच आग विझविण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्रणा नाही, साधे प्राथमिक आरोग्य केंद्रही प्राथमिक उपचारासाठी येथे नाही. आजची ही घटना घडली तेव्हा येथून जवळच असणाºया उपजिल्हा रुग्णालयातही रुग्णवाहिका उपलब्ध नाही. येथील मशनरीही बंद अवस्थेत आहेत.- जनार्दन मानकर, सामाजिक कार्यकर्ते, निजामपूर