शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत निर्णय नाही, सुनील तटकरे यांनी घेतली माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 05:37 IST

२०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील पक्ष कार्यालयात सकाळी बैठक पार पडली. जिल्हानिहाय सर्व जागांचा आढावा घेण्यात येणार आहे.

अलिबाग : रायगड लोकसभेच्या उमेदवारीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुनील तटकरे यांनी माघार घेतली आहे. रत्नागिरीमधील त्यांचे कट्टर विरोधक माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनीही रायगड लोकसभेची जागा लढण्याची इच्छा व्यक्त केल्याने शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये कोणताही निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे रायगड लोकसभा मतदार संघाचा किल्ला कोण लढवणार हे स्पष्ट झाले नाही. तटकरे यांनी माघार घेतल्याने रायगडमधली त्यांच्या समर्थकांमध्ये मात्र प्रचंड नाराजी आहे.२०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील पक्ष कार्यालयात सकाळी बैठक पार पडली. जिल्हानिहाय सर्व जागांचा आढावा घेण्यात येणार आहे. शनिवारच्या बैठकीमध्ये १७ जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. सुरुवातच लोकसभेच्या उमेदवारीवरून झाली.बैठकीमध्ये तटकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, असा त्यांच्या समर्थकांचा विश्वास होता. २०१४ साली सुनील तटकरे यांनी ही जागा शिवसेनेचे खासदार केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या विरोधात लढवली होती. त्यामध्ये तटकरे यांचा अवघ्या दोन हजार ११० मतांनी पराभव झाला होता.तटकरे यांना त्या वेळी शेकापने कडाडून विरोध केला होता. चिपळूण विधानसभेची जागा २००४ आणि २००९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढलेले रमेश कदम यांना शेकापने उमेदवारी देऊन तटकरे यांच्या समोर कडवे आव्हान उभे केले होते.शनिवारी पार पडलेल्या बैठकीमध्ये रायगड लाकसभेच्या जागेबाबतचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्या वेळी भास्कर जाधव हे निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी जाधव यांनी सांगितले. त्यानंतर चिपळूणमधील पदाधिकाऱ्यांना विचारण्यात आले असता त्यांनी स्पष्ट भूमिका न घेता पक्ष जो उमेदवार देईल, त्याचे काम करण्यात येईल, असे सांगितले.त्यानंतर सुनील तटकरे यांनी निवडणूक लढणार नसल्याचे बैठकीमध्ये स्पष्ट केले. त्यावर शरद पवार यांनी उमेदवार जाहीर केला नसल्याचे सांगितले; परंतु संतप्त झालेल्या तटकरे यांनी मी निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही. पक्ष जो उमेदवार देईल त्याचे काम माझे कार्यकर्ते मनापासून करतील, असे ठणकावून सांगितले. त्यानंतर मावळ लोकसभेच्या जागेबाबत बैठक सुरू झाली.बैठकीत ठामपणे मागणी नाहीचसुनील तटकरे हे २०१४ ची लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार नव्हते, केवळ पक्षाचा आदेश असल्याने ते शिवधनुष्य त्यांनी उचलेले होते. त्यामध्ये त्यांचा पराभव झाला; परंतु त्यांनी गीते यांना कडवी झुंज दिली होती, हे लपलेले नाही.२०१४ चा वचपा काढण्यासाठी तटकरे यांना २०१९ साली पुन्हा संधी दिली जाईल, असा पुरा विश्वास होता. मात्र, भास्कर जाधव यांच्या नावाने माशी शिंकल्याची तटकरे समर्थकांची धारणा झाली.राष्टवादी काँग्रेसचे अली कौचाली वगळता तटकरे यांनाच रायगड लोकसभेची जागा द्यावी, अशी ठामपणे मागणी बैठकीमध्ये कोणी केली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.वास्तविक पाहता सुनील तटकरे यांनाच उमेदवारी देणे गरजेचे आहे. २०१४ सालच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी पक्षाने दिली पाहिजे.याआधीच्या निवडणुकीत अनंत गीते हे एक लाख मताधिक्क घेऊन निवडून येत होते. मात्र, तटकरे यांनी त्यांना फक्त दोन हजार मतांवरच विजय मानण्यास भाग पाडले होते.सुनील तटकरेच त्यांना कडवे आव्हान देऊ शकतात, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज धुमाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड