शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

मुरूडची आदिवासी वाडी अंधारात

By admin | Updated: August 29, 2015 22:14 IST

देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे पूर्ण होत असतानासुद्घा काही भागात विजेची व्यवस्था पोेहोचलेली नाही. गरीब आदिवासी लोकांच्या निवेदनाकडे विद्युत मंडळाकडून वारंवार दुर्लक्ष होत

आगरदांडा : देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे पूर्ण होत असतानासुद्घा काही भागात विजेची व्यवस्था पोेहोचलेली नाही. गरीब आदिवासी लोकांच्या निवेदनाकडे विद्युत मंडळाकडून वारंवार दुर्लक्ष होत आहे. मुरूड तालुक्यातील वावडुंगी ग्रामपंचायत हद्दीत सुतारमाळ आदिवासी वाडी असून इथे २५ ते ३० घरे आदिवासी कुटुंबवस्ती करून राहत आहेत. सुमारे ७० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या सुतारमाळ आदिवासी वाडीला गेली अनेक वर्षे वीज मिळालेली नाही.मुरूड-वावडुंगी ग्रामपंचायत ही १९९२ ला निर्माण झाली आहे व त्याच्या अनेक वर्षांपासून ही कुटुंब या ठिकाणी राहत आहेत. रॉकेलच्या दिव्याखाली येथील लोक रात्र काढीत आहेत. पण काळोखात त्यांना प्रकाश अद्याप सापडत नाही. रात्र ही एवढी काळीकुट्ट असते हेच त्यांना माहित आहे. परंतु वीज नसल्यामुळे मुले येथील मोठ्या श्क्षिणापासून वंचित राहिले आहेत. परंतु महाराष्ट्र वीज मंडळ अजूनपर्यंत त्यांना प्रकाश देण्यास तयार नाही. याबाबत आमच्या प्रतिनिधीने वावडुंगी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अजित कासार यांची भेट घेतली असता ते म्हणाले की, २०११ पासून ग्रामपंचायतचे ठराव देवूनही सुतारमाळ आदिवासी वाडी प्रकाशमय करण्याची मागणी करत आहोत, परंतु वीज मंडळ अधिकारी, परिक्षण करून जातात, मात्र पुन्हा फिरकत नाही. वीजेसाठी सतत पाठपुरावा करीत आहे. वीज मंडळ अधिकारी लोकांच्या अनास्थेमुळे या सुतारमाळ आदिवासी वाडीला वीज मिळत नसल्याचे स्पष्ट होत आहे. या बाबत वीज मंडळाचे उपअभियंता लांडगे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी तो होऊ शकला नाही. याबाबत लोकप्रतिनिधीनी लक्ष घालावे, अशी मागणी गा्रमस्थांकडून होत आहे. (प्रतिनिधी)