शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

हागणदारीमुक्तीसाठी पालिका सज्ज

By admin | Updated: August 9, 2015 23:20 IST

शहर हागणदारीमुक्त करण्याकरिता पालिकेने ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानात भाग घेतला आहे. त्या अंतर्गत शौचालये बांधण्याकरिता अर्ज भरून घेण्याचे काम सुरू आहे.

पनवेल : शहर हागणदारीमुक्त करण्याकरिता पालिकेने ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानात भाग घेतला आहे. त्या अंतर्गत शौचालये बांधण्याकरिता अर्ज भरून घेण्याचे काम सुरू आहे. या व्यतिरिक्त पालिकेकडून उघड्यावर बसणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याकरिता आता गुड मॉर्निंग पथक नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सोमवारी त्या संदर्भात संपूर्ण नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. अ वर्ग नगरपालिका असलेल्या पनवेल शहरातील वाड्यांची जागा इमारतींनी घेतली आहे. टोलेजंग इमारतीत लोकवस्ती वाढत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय प्रकल्प येत असल्याने पनवेलकडे लोंढेच लोंढे येत आहेत. त्यामध्ये परजिल्हे आणि इतर राज्यातून येणाऱ्या कामगारांची संख्याही सर्वाधिक असते. बिगारी काम करणाऱ्या या कामगारांना राहण्याकरिता घर मिळत नाही. भाड्याने घर घेणे त्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने मिळेल त्या जागेवर झोपड्या करून राहण्याकडे त्यांचा कल अधिक आहे. पनवेल शहरात लक्ष्मी वसाहत, नवनाथ नगर, वाल्मीकीनगर, मालधक्का, लोखंडीपाडा या ठिकाणी झोपडपट्ट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्या ठिकाणी नगरपालिकेने पाण्याची सोय केली असली तरी सांडपाण्याची व्यवस्था त्याचबरोबर शौचालयाची अपुरी संख्या आहे. काही झोपडपट्ट्यांमध्ये सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली असली तरी ती पर्याप्त लोकवस्तीला अपुरी आहे. कित्येक झोपडपट्ट्यांमध्ये शौचालये नसल्याने ते प्रातर्विधी उघड्यावर उरकतात. त्यामुळे स्वच्छतेचा बोजवारा उडून दुर्गंधी निर्माण होते. या व्यतिरिक्त डासांची निर्मिती होऊन रोगराई सुध्दा पसरते.एकीकडे पनवेल शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याकरिता पालिका प्रशासन अधिक परिश्रम घेत आहे. मात्र उघड्यावर बसणाऱ्यांमुळे स्वच्छतेचा बोजवारा उडत असून त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पनवेल नगरपालिकेने स्वच्छ महाराष्ट्र अभियानात सहभागी होऊन त्यामाध्यमातून हा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या दृष्टीनेही पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. त्या दृष्टीने नियोजन सुरू असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. (वार्ताहर)