शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

पेट्रोकेमिकल संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 04:58 IST

हस्तांतर अधांतरीच : लोणेरे तंत्रशास्त्र विद्यापीठ व पेट्रोकेमिकल संस्था

गिरीश गोरेगावकरमाणगाव : कोकणातील अग्रगण्य रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा (बाटु) एक भाग असणाºया पेट्रोकेमिकल इंजीनियरिंग संस्थेचे प्रत्यक्ष हस्तांतरण गेली चौदा वर्षे रखडले आहे. त्यामुळे या संस्थेवर नियंत्रण तंत्रशिक्षण संचालनालयाचे की विद्यापीठाचे हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. याविरोधात संस्थेच्या कर्मचाºयांनी बुधवार, ३ आॅक्टोबर पासून आंदोलन सुरू केले आहे.

संस्थेतील ४१ शिक्षकेतर कर्मचाºयांनी विद्यापीठाकडून अपेक्षित सेवा न मिळाल्याने आंदोलनाचा इशारा दिला आहे. ११ मे १९९२ च्या शासननिर्णयानुसार जागतिक बँक प्रकल्पांतर्गत पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापन, मालमत्ता, दायित्व व जबाबदाºयांसह ही संस्था विद्यापीठाकडे वर्ग करण्यात यावी असा आदेश देण्यात आला. त्यानुसार पेट्रोकेमिकल संस्था २00४ मधील करारानुसार विद्यापीठात विलीन झाली आहे. मात्र अद्यापही या संस्थेवर तंत्रशिक्षण संचालकांचे नियंत्रण आहे. यावर कोणताही ठोस निर्णय अद्याप झालेला नाही, असा आरोप कर्मचाºयांनी केला.शासनाचे तंत्रशिक्षण संचालनालय व राज्य सरकार यांच्या अनास्थेमुळे हा प्रश्न चौदा वर्षे रखडला आहे.पदविका कर्मचाºयांच्या मागण्यांसाठी मंत्रालयात वारंवार चौकशी करतो. विद्यापीठाकडून प्रक्रि या पूर्ण झाली असून मंत्रालयात हे प्रकरण प्रलंबित आहे.- प्रा. विलास गायकर, कुलगुरू,डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेडॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात इन्स्टिट्यूट आॅफ पेट्रोलियम इंजिनियरिंगच्या समावेशाबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जाईल. या प्रश्नाबाबत कर्मचाºयांना न्याय देण्याचा प्रयत्न करू.- अ‍ॅड. निरंजन वसंत डावखरे, आमदार,भाजपा, कोकण पदवीधर मतदारसंघविद्यापीठ आणि शासनाच्या वतीने तंत्रशिक्षण संचालनालय यांच्यात झालेल्या करारनाम्यानुसार मंजूर पदे विद्यापीठात वर्ग झाल्याचा शासन निर्णय त्वरित निर्गमित करावा.- अनिल कुंभार, अध्यक्ष, कर्मचारी संघटनाकर्मचारी आंदोलनाची रूपरेषा3 ते १२ आॅक्टोबर काळ्या फिती लावून आंदोलन१५ ते १९ आॅक्टोबर लेखणी बंद आंदोलन२0 आॅक्टोबरएक दिवसाचे लाक्षणिक उपोषण२२ आॅक्टोबर दिवसरात्र बेमुदत साखळी उपोषण.सावत्रपणाची वागणूकच्डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा भाग म्हणून सन १९८१ मध्ये कोकणातील लोणेरे येथे रायगड पॉलिटेक्निक संस्था स्थापन करण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला. सन १९८२ मध्ये लोणेरेत प्रत्यक्ष केमिकल अभियांत्रिकी डिप्लोमा सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला.च्डॉ. आंबेडकर विद्यापीठाची स्थापना सन १९८९ मधील कायद्यान्वये करण्यात आली. त्यानंतर मे १९९२ मध्ये घेतलेल्या शासन निर्णयानुसार रायगड पॉलिटेक्निक हे इन्स्टिट्यूट आॅफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग (आयओपीई) मध्ये रूपांतरित करण्यात आले.च्तसेच या संस्थेचे स्वतंत्र अस्तित्व न ठेवता ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले होते; मात्र अद्यापही विद्यापीठ या संस्थेतील कर्मचाºयांना सावत्रपणाची वागणूक देत आहे.शैक्षणिक बाबींचा लाभ पदविका विभागातील शिक्षकेतर कर्मचाºयांना मिळत नाहीच्कागदोपत्री विलीनीकरण झालेले असताना प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप पदविका अभ्याक्रमातील शिक्षकेतर कर्मचाºयांनी केला. पदविका आणि पदवी, पदव्युत्तर अभियांत्रिकी अभ्याक्र मासाठी दोन इमारती अस्तित्वात आहेत. मात्र संस्थेचे विलीनीकरण झालेले असताना पदविका व पदवी विभागा अंतर्गत परस्पर बदल्या, पदभरती, टेक्विपनुसार प्रशिक्षण अशा शैक्षणिक बाबींचा लाभ पदविका विभागातील शिक्षकेतर कर्मचाºयांना मिळत नसल्याचे कर्मचाºयांनी सांगितले. अधिक माहितीसाठी तंत्रशिक्षण विभागातील सुप्रिया घोटाळे यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही. 

टॅग्स :Raigadरायगड