शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 14:23 IST2021-05-15T14:18:00+5:302021-05-15T14:23:21+5:30

Jayant Patil : कोरोनाच्या पार्श्वभुमीवरील लॉकडाऊनमुळे त्यांच्या पार्थिवावर मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीतच पेझारी येथील वैकूंठधाममध्ये अत्यंसंस्कार करण्यात आले.

Mother of MLA Jayant Patil passed away | शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन

शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन

रायगड : शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, माजी मंत्री मीनाक्षी पाटील, माजी आमदार पंडित पाटील, अ‍ॅड राजन पाटील, सुनंदा पाटील यांच्या मातोश्री सुलभाकाकू प्रभाकर पाटील यांचे पेझारी येथील निवासस्थानी शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. 

शनिवारी सकाळी 11.20 च्या सुमारास त्यांचे देहावसान झाले. कोरोनाच्या पार्श्वभुमीवरील लॉकडाऊनमुळे त्यांच्या पार्थिवावर मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीतच पेझारी येथील वैकूंठधाममध्ये अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सुपूत्र आ. जयंत पाटील, माजी मंत्री मीनाक्षी पाटील, माजी आमदार पंडित पाटील, अ‍ॅड राजन पाटील, सुनंदा पाटील, विकास पाटील, सुप्रिया पाटील, भावना पाटील, अ‍ॅड निता पाटील, नातू आस्वाद पाटील, नृपाल पाटील, सवाई पाटील, निनाद पाटील, चित्रा पाटील, चित्रलेखा पाटील, सिदधाली पाटील, सुमना पाटील आदी नातेवाईक उपस्थित होते. सध्याच्या लॉकडाऊनमुळे सांत्वनासाठी कुणीही घरी न येता मोबाईलवरुनच सांत्वन करावे असे आवाहन पाटील कुटूंबियांच्यावतीने करण्यात आले आहे

Web Title: Mother of MLA Jayant Patil passed away