मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भरला एक हजाराचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 16:49 IST2020-09-21T16:47:00+5:302020-09-21T16:49:57+5:30
राे-राे व्यवस्थापनाकडून मास्क लावण्याबाबत, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर राखण्याबाबत ध्वनी क्षेपकावरून सूचना देण्यात येत हाेत्या.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भरला एक हजाराचा दंड
रायगड : काेराेनाच्या कालावधीमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक आहे. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मास्क न लावल्यामुळे त्यांना एक हजार रुपयांचा दंड भरावा लागला आहे. राज ठाकरे हे एका खासगी कामानिमित्त मांडवा येथे शुक्रवारी भाऊचा धक्का ते मांडवा या राेराे सेवेने येत हाेते. त्यावेळी ठाकरे यांनी मास्क लावला नव्हता. त्याच वेळी राे-राे व्यवस्थापनाकडून मास्क लावण्याबाबत, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर राखण्याबाबत ध्वनी क्षेपकावरून सूचना देण्यात येत हाेत्या.
काेराेनाचा प्रादुर्भाव राेखणाऱ्या सूचना कानावर पडताच ठाकरे यांना त्यांची चूक उमगली. नियम माेडल्याने याबाबत काही दंड आहे का, अशी विचारणा ठाकरे यांनी शेजारीच असणाऱ्या राे-राे व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्याला केली. ताेंडाला मास्क न लावणाऱ्यांना एक हजार रुपयांचा दंड आहे, असे संबंधित कर्मचाऱ्याने ठाकरे यांना सांगितले.
ठाकरे यांनी तातडीने एक हजार रुपयांचा दंड भरला. ठाकरे मांडवा येथे उतरून आपल्या वाहनाने पुढील प्रवासाला निघून गेले. त्यावेळीही त्यांच्या ताेंडाला मास्क लावलेला हाेता. दरम्यान, काेराेनाबाबतचे नियम घालून सर्वच प्रकारच्या प्रवासी वाहतूकीला सरकारने परवानगी दिली आहे. राेराे प्रशासनालाही याच अटी आणि शर्थींवर परवानगी दिली आहे. त्यांनी नियमानुसारच कारवाई केली आहे.
मनसेकडून स्पष्टीकरण
या घटनेप्रकरणी मनसेचे नेते नितीन सरदेसाईंनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'या प्रवासात मी राज ठाकरेंसोबत होतो. त्यामुळे अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं मी ठामपणे सांगू शकतो,' असे सरदेसाईंनी सांगितलं.