शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

Aditya Thackeray : माथेरानला जगप्रसिद्ध करायचे आहे : आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 6:10 AM

Aditya Thackeray : माथेरान गिरिस्थान नगरपरिषद हद्दीमधील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि उद्घाटनप्रसंगी रविवारी ते बोलत होते.

कर्जत : माथेरानची लाल माती आणि जांभा दगडाचे रस्ते यातून शाश्वत विकास करायचा आहे. यातून माथेरानचे पर्यटन जतन करताना रोजगार निर्मिती करायची आहे. यासाठी माथेरानसाठी जी जी कामे होत आहेत आणि करावी लागणार आहेत, माथेरानला जगप्रसिद्ध करायचे असून हे पाहण्यासाठी स्वत: आवर्जून आल्याचे प्रतिपादन   राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी  केले.

माथेरान गिरिस्थान नगरपरिषद हद्दीमधील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि उद्घाटनप्रसंगी रविवारी ते बोलत होते. राज्य सरकारच्या नगरविकास आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा आदित्य यांच्या हस्ते झाला. त्यानंतर माथेरानमधील नऊ विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.

यावेळी बोलताना पालिकेने उभारलेल्या सभागृहाचे कौतुक करताना माथेरान हे अजून सुंदर बनवायचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले, तर  पालकमंत्री आदिती तटकरे यांनी माथेरानमध्ये पर्यटक अधिक संख्येने यावेत यासाठी पर्यटन विभागाने विविध प्रकल्प आणण्याची गरज व्यक्त केली. त्यासाठी पर्यटन विभागाबरोबर नगरविकास विभाग आणि एमएमआरडीएकडून अधिक निधी मिळावा, अशी मागणी केली.

यावेळी कार्यक्रमाला अभिनेते आदेश बांदेकर, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्यासह माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा संघटक रेखा ठाकरे, आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, येथील नागरिकांनीही विकासकामांबाबत समाधान व्यक्त केले आहे.

या विकासकामांचे झाले लोकार्पण लोकार्पण झालेल्या विकासकामांमध्ये ऑलम्पिया ग्राउंडचा पुनर्विकास करणे, माथेरान शहरातील मुख्य रस्ता ते लॉर्ड पॉइंट रस्ता विकसित करणे, मुख्य रस्ता ते बिग चौक पॉइंट रस्ता विकसित करणे, प्रीती हॉटेल ते पॅनोरमा हॉटेल रस्ता विकसित करणे आणि क्ले पेव्हर ब्लॉक लावणे, स्लाटर   हाऊसचे नूतनीकरण, पंचधील नगर येथील स्वच्छतागृहाचे नूतनीकरण, मुख्य रस्ता ते मंकी पॉइंट हा रस्ता विकसित करणे, मुख्य रस्ता ते कोरोनेशन पॉइंट रस्ता विकसित करणे तसेच माथेरान नगरपरिषद हद्दीत बसविण्यात आलेल्या नावीन्यपूर्ण डस्टबिनचे लोकार्पण करण्यात आले. भूमिपूजन केलेली कामे लवकर पूर्ण करावीत असेही यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेMatheranमाथेरान