शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

मुरुड शहरात बीएसएनएलच्या इंटरनेट सेवेचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 00:07 IST

संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; टपाल खात्याचा कारभार ठप्प

मुरुड जंजिरा : मुरुडमधील बीएसएनएल सेवा वारंवार खंडित पडल्याने एका राष्ट्रीयकृत बँकेला याचा चांगलाच फटका बसला होता. त्यामुळे त्यांनी खासगी कंपनीची सेवा सुरू केली. रायगड जिल्ह्यात बीएसएनएल सेवा वारंवार खंडित होत असताना वरिष्ठ अधिकारी लक्षच देत नसल्याने ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत.मरुडमध्ये ११ नोव्हेंबरपासून बीएसएनएलची नेट सेवा बंद असल्याने मुरुड टपाल कार्यालयातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. रजिस्टर एडी व्यतिरिक्त इतर कोणतेही काम नेट नसल्याने होत नसल्याने टपाल खात्यातील पैसे लोकांना काढता व भरतासुद्धा येत नाहीत.सध्या लग्नसराईचे दिवस असून लोकांना पैशाची गरज आहे. मात्र, नेटसेवा बंद असल्याने हक्काचे पैसे मिळत नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. टपाल आल्यावर त्याची नोंद करण्याचे कामसुद्धा नेटवर आधारित असल्याने टपाल वितरण व्यवस्थेला मोठा फटका सहन करावा लागत आहे. असंख्य लोकांनी या गलथान कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली असून बीएसएनएलने कारभार न सुधारल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.रायगडचे खासदार सुनील तटकरे लवकरच मुरुड दौºयावर येत असून बीएसएनएलचा कारभार सुधारण्याबाबत लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचे काही ग्राहकांनी सांगितले. बीएसएनएल टॉवरला रेंज नसल्याने शेकडोच्या संख्येने मोबाइल बंद अवस्थेत आहेत. तर नेट नसल्याने बँक महसूल कार्यालये आदीचा कारभार गेल्या अनेक दिवसांपासून ठप्प आहे.याबाबत मुरुड नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा कल्पना पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, बीएसएनएल नेट व भ्रमणध्वनी सेवा वारंवार बंद असल्याने असंख्य ग्राहक त्रस्त आहेत. तक्रार करूनसुद्धा तक्रारींचे निवारण होत नसल्याने स्थानिकांमधून संताप व्यक्त होत आहे. बीएसएनएल कंपनीने आपला कारभार लवकरात लवकर सुधारावा, अन्यथा जनआंदोलन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :BSNLबीएसएनएल