शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

रंगीबेरंगी राख्यांनी सजली पेणची बाजारपेठ

By admin | Updated: August 27, 2015 00:51 IST

भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याची वीण घट्ट करणारा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. आपल्या भाऊरायाला रेशमी बंधनात अडकविणारा रक्षाबंधनाची राखी खरेदी करण्यासाठी महिलावर्गाची धावपळ सुरू आहे.

पेण : भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याची वीण घट्ट करणारा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. आपल्या भाऊरायाला रेशमी बंधनात अडकविणारा रक्षाबंधनाची राखी खरेदी करण्यासाठी महिलावर्गाची धावपळ सुरू आहे. गोंडा, कुंदन, खड्याच्या, रुद्राक्ष, रत्न, सोने, चांदीचे वर्ख दिलेल्या विविध प्रकार व रंगीबेरंगी राख्यांनी पेणची बाजारपेठ सजली आहे. सध्या बाजारात राख्यांची खरेदी करण्यासाठी सजलेली दुकाने पेण बाजारपेठेत ग्राहकांसाठी खुली आहेत.२९ आॅगस्ट, शनिवारी रक्षाबंधन सण असून त्या सणाच्या पार्श्वभूमीवर एरव्ही शुकशुकाट असलेल्या बाजारात सकाळ सायंकाळच्या वेळेस गर्दी वाढत आहे. तब्बल २ रु. पासून २५० रु.पर्यंतच्या आकर्षक राख्या बाजारात उपलब्ध आहेत. पूर्वापार चालत आलेल्या या सणाचे महत्त्व आजही तेवढ्याच उत्साहाने अधोरेखित होत आहे. पवित्र राखीचा स्रेहबंधाचा धागा, विविध आकर्षक रुपांनी राख्यांवर साकारला आहे. बच्चे कंपनीसाठी ऐटदार अशा कार्टून कॅरेक्टर छोटा भीम, डोरेमॅन, स्पायडरमॅन, अंग्री बर्ड, बालगणेश, कृष्ण याचबरोबर बाहुबली, बजरंगी भाईजान लेबलच्या राख्या बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत.राखी बांधल्यानंतर बहिणींना भेटवस्तू म्हणून विविध गिफ्ट हॅम्पर्स आणि स्पेशल फेस्टीव्हल कलेक्शन उपलब्ध आहेत. स्वीट डीशमध्ये मिठाईसोबत चॉकलेट, कंदी पेढे बाजारात उपलब्ध आहेत. (वार्ताहर)मोहपाडा बाजारपेठत गर्दीमोहोपाडा : बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन हा सण काही दिवसांवर आल्याने रंगीबेरंगी राख्यांनी मोहोपाडा बाजारपेठेतील दुकाने सजली असून अनेक महिलांची आपल्या भावासाठी राखी खरेदी करण्यासाठी लगबग सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळते.मोहोपाडा बाजारपेठ ही रसायनी परिसराची मुख्य बाजारपेठ असल्याने आसपासच्या ग्रामीण भागातील महिलावर्गाची राखी खरेदीसाठी गर्दी दिसत आहे.