शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

माणगावकरांना पाणीटंचाईची झळ, काळनदीची पातळी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:17 AM

सध्या माणगावकरांना पाणीटंचाईचा फटका बसत आहे.

- गिरीश गोरेगावकर माणगाव : सध्या माणगावकरांना पाणीटंचाईचा फटका बसत आहे. काळनदीची पातळी खूप खोलवर गेल्याने पाणी ओढून घेणाऱ्या तीन वाहिन्यांपैकी एकच वाहिनी चालू असल्याने सध्या माणगावकरांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे.माणगावला नवीन योजना कार्यरत केली आहे; पण तिचा काहीही उपयोग झालेला दिसत नाही. जवळपास सहा कोटी खर्चून उभारलेल्या या फिल्टरेशन प्लान्टचा उपयोग न च्या बरोबर असल्याचे आता बोलले जात आहे. आता पुढील पंधरवड्यात एकदिवस आड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यासाठी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. आता चालू परिस्थिती गंभीर आहे. पाच लाइनला आज तर उरलेल्या पाच लाइनला उद्या, असे नियोजन करण्यात आले आहे. लोक पाणी न आल्याने पाण्याच्या टाक्यांकडे म्हणजेच जलशुद्धी केंद्रात धाव घेत आहेत, यामुळे पाणीपुरवठा कर्मचारी हैराण झाले आहेत. या अडचणीच्या काळात ते अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने काम करीत आहेत. शहरातील नऊ ते दहा लाइनला पाणीपुरवठा करताना पाणीपुरवठा विभागाची दमछाक होत आहे. पूर्वीच्या काळी बांधण्यात आलेल्या जॅकवेल आजही वाढत्या माणगाव शहराला पाणीपुरवठा करण्यात सक्षम आहेत; परंतु वेळच्या वेळी नियोजन करणे गरजेचे आहे. जॅकवेलमधील जवळपास १५ फूट चिखलयुक्त गाळ काढण्याचे मोठे काम हाती घ्यावे लागणार आहे. अन्यथा पाणीटंचाईची झळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. काम दोन वर्षांत एकदा तरी करणे गरजेचे आहे. हे महत्त्वाचे काम करण्यासाठी दोन-तीन दिवसांचा अवधी शटडाउनघ्यावा लागेल, अशी माहितीसंबंधित विभागाकडून प्राप्त झाली आहे.सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागण्याचे चिन्ह दिसत असून जलशुद्धी केंद्रात नवीन पंप, नवीन पॅनल, नवीन वायरिंग करण्यात आली आहे; परंतु आडातच नाही तर पोहºयात कुठून येणार! अशी अवस्था झाली आहे.>माणगाव नगरपंचायतची पाणीयोजना व्यवस्थित आहे. एकूण तीन जॅकवेल आहेत; पण या जॅकवेलमध्ये नदीतून येणाºया तीन वाहिन्यांपैकी काळनदीच्या पाणीपातळीत कमालीची घट झाल्याने एकाच वाहिनीस पाणी येत आहे. त्यामुळे एका वेळी एकच जॅकवेल भरत आहे. यावर उपाय म्हणून लवकरच सबमर्शियल पाइप बसवणार आहोत.- आकाश बुवा, अभियंता, पाणीपुरवठा विभाग,नगरपंचायत माणगाव