शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

महाड शहर डेंग्यूग्रस्त घोषित

By admin | Updated: August 7, 2015 23:11 IST

गेल्या महिनाभरापासून महाड शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून या पार्श्वभूमीवर महाड शहर डेंग्यूग्रस्त म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती शासकीय

महाड : गेल्या महिनाभरापासून महाड शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून या पार्श्वभूमीवर महाड शहर डेंग्यूग्रस्त म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप यांनी शुक्रवारी झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली. महाड शहरात १६७ तर ग्रामीण भागात १४ रुग्ण डेंग्यूबाधित असल्याची माहितीही डॉ. जगताप यांनी यावेळी दिली.महाड नगरपरिषद प्रशासनाला शहरात स्वच्छतेबाबतची काळजी घ्यावी अशा सूचना पत्राद्वारे दिल्या आहेत. त्यादृष्टीने नगरपरिषदेने शहरात जंतूनाशक फवारणी नगरपरिषदेकडे, एकच फॉगिंग मशिन उपलब्ध असल्याने अडचण निर्माण झाली होती. मात्र जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत यासाठी नगरपरिषदेला आणखी चार फॉगिंग मशिन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.गेल्या काही दिवसांपासून आरोग्य यंत्रणा सतर्क असून गुरुवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खंडागळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागांवकर, डॉ. गायकवाड आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहराला भेट देवून नगरपरिषद प्रशासनाशी उपाययोजनांबाबत चर्चा केली. त्यानुसार शुक्रवार संपूर्ण शहरात प्रत्येक कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेवून जनजागृती व उपाययोजना करण्यासाठी १७ पथके पाठवण्यात आली आहेत. तापाने त्रस्त रुग्णांच्या रक्त तपासणीसाठी खाजगी पॅथॉलॉजिस्ट मनमानी करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यांच्याकडून अवास्तव तपासणी शुल्क आकारले जात आहे. मात्र पॅथॉलॉजिस्टनी सद्यस्थितीत ४५० रुपयेपेक्षा अधिक शुल्क रुग्णांकडून आकारू नये अशा सूचना सर्व पॅथॉलॉजिस्टना देण्यात येतील, असेही डॉ. जगताप यांनी स्पष्ट केले.स्वच्छतेबाबत नगरपरिषद प्रशासनाने अधिक सतर्कपणे व जागरुकपणे काम करावे, असे डॉ. जगताप यांनी सांगितले. शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नगरपरिषद प्रशासनाकडून सर्वत्र जंतुनाशक फवारणी केली जात असली तरी मुख्य रस्त्यावरील तुंबलेले गटार व नाले कचऱ्याने भरलेल्या कचराकुंड्या ही परिस्थिती शहरात सर्वत्र दिसून येत आहे. डोंगरपूल, प्रभात कॉलनी, सरेकर आळी, गवळआळी या परिसरात दुर्गंधीचे पसरली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.