शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

पाली तालुक्यात पशुधन अधिकाऱ्यांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 02:39 IST

सर्वच अधिकारी अतिरिक्त कार्यभारावर : आठ पदांपैकी सहा रिक्त

विनोद भोईर पाली : सुधागड तालुक्यात पाली, चव्हाणवाडी आणि जांभूळपाडा या ठिकाणी श्रेणी एकचे गुरांचे दवाखाने तर वाघोशी, खवली आणि नांदगाव श्रेणी दोनचे गुरांचे दवाखाने आहेत; परंतु येथील गुरांच्या दवाखान्यात पशू वैद्यकीय अधिकारी व अन्य पदे रिक्त आहेत. पाली या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या गुरांच्या दवाखान्यात पशू वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक ही तीनही पदे रिक्त असून, फक्त शिपाई पदावर एक कर्मचारी हजर आहे. तर तालुक्यातील सर्वच दवाखान्यांत आठ जागांपैकी फक्त दोनच जागांवर कर्मचारी आहेत. यामुळे सुधागड तालुक्यातील जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तर शेतकरी आपल्या गुरांना उपचारासाठी कुठे न्यायचे या विवंचनेत सापडला आहे.

पाली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार पाली येथील श्रेणी एकच्या गुरांच्या दवाखान्यात पशू वैद्यकीय अधिकारी व विस्तार अधिकारी या दोन्ही पदांवर नागोठणे येथील पशू वैद्यकीय अधिकारी भोजने यांना अतिरिक्त कार्यभार असून, मंगळवार आणि शुक्रवारी ते हजर असतात, तर वाघोशी येथील पशुधन पर्यवेक्षकांना अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. चव्हाणवाडी येथील श्रेणी एकच्या दवाखान्यात पेण येथील पशू वैद्यकीय अधिकारी तर जांभूळपाडा येथे खालापूर येथील पशू वैद्यकीय अधिकारी यांना अतिरिक्त कार्यभार दिला आहे.

सध्या जिल्ह्णाच्या तापमानात होत असलेल्या वाढीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. उन्हापासून माणसे विविध मार्गांनी आपला बचाव करून घेऊ शकतात. मात्र, जनावरांना या कडक उन्हाचा फटका बसत आहे. गायवर्गीय गुरे आणि प्रजननक्षम असलेल्या गुरांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. चारा व पाणीटंचाईमुळे जिल्ह्णातील जनावरांची रानोमाळ भटकंती सुरू आहे. त्यात पाण्याची कमतरता असल्याने जनावरांवर विपरीत परिणाम होत आहे. त्यात वाढत असलेली उन्हाची तीव्रता, यामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात आहे. उन्हाचा पारा वाढत असल्याने जनावरे उष्माघाताचे बळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उष्माघातामध्ये जनावरांच्या शरीराचे तापमान १०३ ते १०७ अंशांपर्यंत वाढते. यामुळे श्वसनाचा वेग व हृदयाचे ठोके वाढणे, जीभ बाहेर काढून तोंडाने श्वसन करणे, लाळ गाळणे, नाकातून स्राव येणे, भरपूर तहान लागणे, अस्वस्थता येणे, जनावराचा तोल जाऊन जनावर कोसळणे, झटके येणे व जनावरे दगावण्याची भीती वाढली आहे. चारा व पाण्याच्या शोधात अनेक जनावरांना उन्हाचा फटका बसत असून, वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे जनावरांसाठी पशुधन विभागाकडून लसीकरण व पशूपालकांना मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली आहे.जनावरांचे आजार काही ऋ तूनुसार असतात, त्या वेळी डॉक्टर उपलब्ध नसतात, अशा वेळी स्थानिक पातळीवर इलाज केला जातो व जनावरे दगावतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. दवाखान्यात नेले तर लसी, इंजेक्शन उपलब्ध नसतात आणि ग्रामीण भागात तातडीने हे मिळत नाहीत, त्यामुळे दुभती जनावरे मरताना आम्ही आमच्या डोळ्यांनी बघतो. तरी शासनाने यात लक्ष घालावे व शेतकऱ्यांचे पशुधन वाचवावे, म्हणजे कुटुंबाला हातभार लागेल.- शरद गोळे, शेतकरी, शिळोशी 

टॅग्स :Electionनिवडणूकcowगाय