शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

यांत्रिकीकरणामुळे पशुधन होतेय हद्दपार

By admin | Updated: August 6, 2015 23:29 IST

काही वर्षांच्या काळात शेती कामासाठी ट्रॅक्टर पॉवर टिलरचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यापूर्वी रायगड जिल्ह्यात दळणवळणासाठी

बोर्ली-मांडला : काही वर्षांच्या काळात शेती कामासाठी ट्रॅक्टर पॉवर टिलरचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यापूर्वी रायगड जिल्ह्यात दळणवळणासाठी बैलगाडीचा उपयोग मोठ्याप्रमाणत होत असे, मात्र आता शेतातील धान्य मालवाहतुकीसाठी टेम्पोसह अन्य वाहने मोठ्याप्रमाणावर धावू लागली. त्यातच रात्री गुरे चोरण्याचे प्रकार वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे बैल, गाय, म्हैस असे पशुधन कमी होत आहे.लोकसंख्येच्या तुलनेने पशुधनाची झपाट्याने घटणारी संख्या हा रायगड जिल्ह्यात चिंतेचा विषय बनला आहे. रायगड जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यातील परिसर हा निसर्गरम्य असून शेतीबरोबर पशुधन हा मोठ्या प्रमाणात होते. जिल्ह्यातील औद्योगिकीकरणामुळे शेतीच्या तंत्रज्ञानाच्या बदलासोबत पशुधनाचा उपयोग कमी होत गेला. दूध उत्पादन हा एकच पशुधन सांभाळण्यासाठी टिकणारा उद्योग ठरला. दूध डेअरी प्रकल्प झपाट्याने वाढल्याने स्पर्धेत शेतकऱ्यांच्या दूध व्यवसायाला मागणी कमी झाली. स्पर्धेमध्ये स्वस्त दूध शोधण्याच्या नादात पावडरयुक्त दूध मिळत असल्याने ग्राहकांची फसवणूक होत आहे असे शेतकरी संदेश पाटील यांनी सांगितले. शेतीमध्ये ट्रॅक्टर, टिलर पॉवरचा सर्रास उपयोग होवू लागला असल्याने शेतीच्या मशागतीची कामे ट्रॅक्टरसारख्या आधुनिक साधनाने मोठ्याप्रमाणात होवू लागली त्यामुळे जनावरे ठेवणे डोकेदुखी होवू लागली आहे. शेतकऱ्यांकडे जनावरांचे प्रमाण कमी झाल्यामुळे शेतीला शेणखत मिळणे दुरापास्त झाले आहे. सेंद्रिय शेतीचा आधारच शेणखत आहे. सध्या उत्तम सेंद्रिय शेतीसाठी जमिनीमध्ये सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण फारच कमी झाले आहे. (वार्ताहर)