जमिनीवर आपटल्याने चिमुरडीचा मृत्यू, उरण पोलिसांनी पित्याला केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 08:44 IST2024-06-11T08:42:59+5:302024-06-11T08:44:33+5:30

Uran Crime News: भांडणाच्या रागातून पत्नीच्या कुशीत पहुडलेल्या पाच महिन्यांच्या चिमुरडीला पतीने हिसकावून जमिनीवर आपटल्याने निष्पाप बाळाचा मृत्यू झाला. याप्रकरणी उरण पोलिसांनी पित्याला अटक केली.

Little girl died after hitting the ground, Uran police arrested the father | जमिनीवर आपटल्याने चिमुरडीचा मृत्यू, उरण पोलिसांनी पित्याला केली अटक

जमिनीवर आपटल्याने चिमुरडीचा मृत्यू, उरण पोलिसांनी पित्याला केली अटक

 उरण - भांडणाच्या रागातून पत्नीच्या कुशीत पहुडलेल्या पाच महिन्यांच्या चिमुरडीला पतीने हिसकावून जमिनीवर आपटल्याने निष्पाप बाळाचा मृत्यू झाला. याप्रकरणी उरण पोलिसांनी पित्याला अटक केली.

अमृता आणि खुशीराम ठाकूर हे दाम्पत्य रुही या पाच महिन्यांच्या मुलीसह बोकडवीरा ग्रामपंचायत हद्दीत भाड्याच्या खोलीत अनेक दिवसांपासून राहतात. रविवारी पती-पत्नीत भांडण झाले. भांडणामुळे रागावलेली अमृता मुलीला घेऊन शेजारी राहणारे नातेवाईक बिन्नीलाल बुधा राम याच्या घरी गेली. त्यावेळी खुशीरामही तिच्या मागेमागे गेला. ‘हमारी लडकी हमारे पास दे दो’ असे बोलत तिथे भांडण केले. रुहीला देण्यास विरोध केला. त्यामुळे आणखी संतापलेल्या खुशीरामने जबरदस्तीने अमृताच्या कुशीतून रुहीला  ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत मुलीला जमिनीवर आपटले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.  

Web Title: Little girl died after hitting the ground, Uran police arrested the father