शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढलेले IPS अधिकारी सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक
2
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
3
तुमचे पैसे SBI, HDFC किंवा ICICI बँकेत असेल तर खुशखबर! RBI ने 'या' ३ बँकांसाठी केली मोठी घोषणा
4
ॲपलचा विरोध, विरोधकांचाही विरोध! केंद्राचा  'संचार साथी' ॲपवर यू-टर्न, प्री-इंस्टॉल करण्याची अनिवार्यता मागे घेतली...
5
५ मुलांची आई भंगारवाल्याच्या प्रेमात पडली! वयाचाही विचार केला नाही; पतीसमोर बांधली दुसरी लग्नगाठ
6
Ruturaj Gaikwad Maiden Century : पुणेकरानं संधीचं सोनं करुन दाखवलं! या कारणामुळं ऋतुराजची पहिली सेंच्युरी ठरते खास
7
काय सांगता? फक्त स्वत:ला पाहण्यासाठी नाही तर 'या' कारणांसाठी लिफ्टमध्ये असतो आरसा
8
सांगलीतील आष्ट्यातील स्ट्राँगरुमबाहेर महाविकास आघाडीचा गदारोळ; मतांच्या आकडेवारीत तफावत, सुरक्षा नसल्याचाही दावा
9
अल-फलाहचा बनावट कारभार! रोज तयार व्हायची १००-१५० बोगस रुग्णांची यादी; विरोध केल्यास हिंदू कर्मचाऱ्यांचा पगार कापायचे
10
"कपडे घालून या नाहीतर गोळ्या घालू..."; जैन मुनींशी गावगुंडाचे असभ्य वर्तन, समाज संतप्त
11
श्रद्धा कपूरने बॉयफ्रेंड राहुल मोदीला हाताने भरवली 'जापानी डिश', व्हिडीओ व्हायरल
12
पुतीन भारतात येण्यापूर्वी रशियाकडून मोठी भेट...! रशियन लष्करी तळ वापरता येणार, त्यांच्या संसदेची मंजुरी...
13
दिल्ली कार स्फोटातील मुख्य आरोपी जसीरच्या कोठडीत वाढ! NIA आणखी चौकशी करणार; नेमके आरोप काय? 
14
Gold Silver Price Today: चांदी ऑल टाईम 'हाय'वर; सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदी करणार असाल तर खिसा करावा लागेल रिकामा
15
'मुंबई इंडियन्स'ने संघात घेताच कर्णधार शार्दुल ठाकूरचा धमाका; ७ चेंडूत घेतले ४ बळी
16
फार्मा क्षेत्रातील दुसरी सर्वात वेगवान वाढणारी कंपनी IPO आणतेय; एका लॉटसाठी किती पैसे लागणार?
17
सावधान! आईस्क्रीम, च्युइंगम, शुगर फ्री प्रोडक्टमुळे लिव्हर खराब; खाण्याआधी एकदा 'हे' वाचाच
18
'जनता माफ करणार नाही', पंतप्रधान मोदींचा चहा विकतानाच्या एआय व्हिडिओवरुन भाजपची जोरदार टीका
19
iPhone Air च्या किंमतीत मोठी घसरण, आजवरचा सर्वात स्लीम iPhone सर्वात स्वस्त! जाणून घ्या सविस्तर
Daily Top 2Weekly Top 5

म्हसळा नगरपंचायतीची आरक्षण सोडत; १७ जागांसाठी नऊ प्रभाग महिलांसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 01:02 IST

आठ जागांवर पुरुष रिंगणात, खुल्या प्रवर्गासाठी आठ प्रभाग राहणार असून यातील प्रभाग क्रमांक ८, ११, १५ आणि १७ हे प्रभाग महिलांकरिता आरक्षित ठेवले आहेत.

म्हसळा : म्हसळा नगरपंचायत निवडणुकीची आरक्षण सोडत शनिवारी कन्याशाळेच्या हॉलमध्ये जाहीर करण्यात आली. १७ जागांसाठी होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत नऊ प्रभाग महिलांसाठी आरक्षित असून, आठ जागांवर पुरुष अथवा स्त्री उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. ही बैठक प्रारूप प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीविषयी घेण्यात आली. प्रभाग रचनेत कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. मात्र सगळ्या वॉर्डचे भौगोलिक रचनेनुसार नंबर बदलले

आरक्षण सोडत काढण्यासाठी श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज उकिरडे यांनी कामकाज पाहिले. नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित तर प्रभाग क्र. ४ अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे. यातही हे दोन्ही प्रभाग महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग याकरिता प्रभाग क्रमांक २, ३, ६, ७ आणि १३ हे प्रभाग राखीव करण्यात आले असून यात प्रभाग क्रमांक २, ३, १३ हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव ठेवले आहेत.

खुल्या प्रवर्गासाठी आठ प्रभाग राहणार असून यातील प्रभाग क्रमांक ८, ११, १५ आणि १७ हे प्रभाग महिलांकरिता आरक्षित ठेवले आहेत. तर उर्वरित ५, ९, १० आणि १४ हे प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले ठेवले. या वेळी नगराध्यक्ष जयश्री कापरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समीर बनकर, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के, काँग्रेसचे मोईज शेख, रफिक घरटकर, शिवसेना शहर प्रमुख अनिकेत पानसरे, भाजप शहर अध्यक्ष संतोष पानसरे आदी उपस्थित होते.

मोजक्याच महिलांची उपस्थितीआरक्षण सोडतीवेळी शहरातील एकूण नऊ प्रभाग हे महिलांसाठी आरक्षित होत असताना मोजक्याच महिला प्रतिनिधींची उपस्थिती होती. आरक्षण सोडतीवेळी निवडणुकीविषयी महिलांमध्ये असलेली उदासीनता प्रकर्षाने जाणवली.

गणिते जुळवायला सुरूवातआरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर अनेकांना खुशी झाली तर काही आपल्याला सोयीनुसार प्रभागात आरक्षण न पडल्यामुळे नाराज झाल्याचे चित्र होते. काहींनी मात्र लगेच गणिते जुळवायला सुरुवात केल्याचे चित्रसुद्धा दिसत होते.