शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

कोपरा उड्डाणपूल दोन महिने बंद; खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:01 PM

पनवेल : सायन- पनवेल महामार्गावरील उड्डाणपुलावरील खड्डे सर्वांचीच डोकेदुखी ठरत आहे. उड्डाणपुलावरील खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कामाला ...

पनवेल : सायन-पनवेलमहामार्गावरील उड्डाणपुलावरील खड्डे सर्वांचीच डोकेदुखी ठरत आहे. उड्डाणपुलावरील खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कामाला सुरु वात करण्यात आली आहे. कोपरा उड्डाणपुलाचा भुयारी मार्गही सुमारे दोन ते अडीच महिने बंद राहणार आहे.

उड्डाणपुलावर पडणारे खड्डे बुजविण्यासाठी पीक्यूसी या विशेष तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. विशेष म्हणजे, या कामात अडथळा निर्माण होऊ नये, म्हणून कोपरा उड्डाणपुलाखालील भुयारी मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या ठिकाणाहून होणारी वाहतूक हिरानंदानी मार्गे सायन-पनवेल महामार्गाकडे वळविण्यात आली आहे. तसेच कोपरा गाव व हुंदाई शोरूम सेक्टर -१० कडे जाणारे दोन्ही मार्ग बंद करण्यात आले आहेत. शनिवारी कोपरा भुयारी मार्गाची वाहतूक बंद केल्याने वाहनचालक संभ्रमात होते. कोपरा भुयारी मार्गाखालून दररोज शेकडो वाहने ये-जा करीत असतात. या कामामुळे महामार्गावर सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतुककोंडी झाली होती. वाहनांच्या १ किलोमीटरपेक्षा जास्त रांगा लागल्या होत्या.

 

कोपरा उड्डाणपुलाच्या काँक्रीटीकरणासाठी भुयारी मार्ग बंद करण्यात आले आहेत. पुढील दोन ते अडीच महिने काँक्रीटीकरणाचे काम सुरू राहणार असल्याने या ठिकाणची वाहतूक बंद राहणार आहे. काँक्रीटीकरणासाठी पीक्यूसी या विशेष तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.-ए. पी. पाटील, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

टॅग्स :panvelपनवेलhighwayमहामार्ग