शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

उत्खननामुळे कोकण रेल्वेमार्गाला धोका; रेल्वे प्रशासनाचे सुरक्षेकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 3:03 AM

महाड तालुका हा डोंगराळ भागात असून, कोकण रेल्वे तसेच दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्या याच मार्गावरून जातात. सध्या कोकण रेल्वेच्या दुपरीकरणाचे काम सुरू आहे.

- सिकंदर अनवारेदासगाव : महाड तालुका हा डोंगराळ भागात असून, कोकण रेल्वे तसेच दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्या याच मार्गावरून जातात. सध्या कोकण रेल्वेच्या दुपरीकरणाचे काम सुरू आहे. या दुपदरीकरणाला भरावाची गरज असल्याने रेल्वेमार्गा शेजारी असलेल्या टेकडीवर उत्खननाचे काम सुरू करण्यात आले आहे. महाडजवळ असलेल्या वामणे-सापे रेल्वेस्थानकाजवळ हे काम केले जात आहे. हे उत्खनन करताना कोकण रेल्वे प्रशासनाने सुरक्षेची काळजी न घेता, उत्खनन सुरू केल्याने पटरीवरून जाणाºया रेल्वे गाड्यांना धोका निर्माण झाला आहे.कोकणच्या विकासासाठी कोकण रेल्वे सुरू करण्यात आली असली, तरी या रेल्वेमार्गाचा वापर अन्य राज्यांत जाणाºया प्रवाशांनाच अधिक होत आहे. कोकणातील दºया-खोºयातून जाणारा हा मार्ग असल्याने दरवर्षी रेल्वेमार्गावर दरडी कोसळणे, पटरीवर दगडी येणे, तसेच पटरी खचणे, असे प्रकार होऊन मार्ग अनेकदा बंद करावा लागतो.कोकण रेल्वेमार्गावरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने गाड्यांची संख्या वाढवली आहे. मात्र, एकेरी मार्ग असल्याने क्रॉसिंगच्या वेळेस गाड्यांना तासन्तास थांबावे लागते. आता ही समस्या दूर करण्यासाठी दुपदरीमार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. महाड जवळ वामणे-सापे रेल्वेस्थानकावर क्रॉसिंग स्टेशन उभारण्यात येत असून, याकरिता हजारो ब्रास माती लागणार आहे. पटरीच्या शेजारीच कोकण रेल्वेच्या मालकीची टेकडी आहे. या टेकडीचे उत्खनन संबंधित ठेकेदाराकडून करण्यात येत आहे. स्थानकाजवळ असलेला रेल्वेमार्गही डोंगर खोदूनच तयार करण्यात आला आहे. या रेल्वेरुळापासूनच टेकडी सुरू होते. टेकडीच्या वरील बाजूने उत्खनन न करता, ते पायथ्यापासून करण्यात येत आहे. मात्र, त्यामुळे टेकडी कमकुवत झाली असून टेकडीचा एखादा दगड पटरीवर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. हे उत्खनन करताना रेल्वे प्रशासनाने कोणतीच खबरदारी घेतलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.सापे रेल्वेस्थानकाजवळ कोकण रेल्वेची सर्व्हे नंबर ५१/४अ १, ५४अ२ या क्र मांकाचे दोन सातबारे असून, याचे क्षेत्रफळ चार हेक्टर आहे. चार हेक्टरमधून ही माती भरावासाठी वापरली जात आहे.महसूल विभागाकडून कोकण रेल्वे प्रशासनाने कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. शिवाय, पटरीच्या शेजारी कोणत्याही सुरक्षा यंत्रणा किंवा उपाययोजना केलेल्या नाहीत. या ठिकाणी पटरीवर दगड आल्यास धोका निर्माण होणार आहे. या मार्गावरून दररोज जवळपास ६० गाड्या धावत असून, हजारो प्रवासी प्रवास करतात. कोकणातील भौगोलिक स्थिती पाहता या मार्गावरील दरडींचा धोका लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाची डोळेझाक प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. येत्या महिन्याभरात हे काम पूर्ण होऊ शकणार नसल्याने ऐनपावसाळ्यात उत्खनन केलेल्या भागावरून पाण्याबरोबर माती आणि दगडी रूळावर येण्याची शक्यता आहे.कोकण रेल्वे प्रशासनाचा हलगर्जीपणाकोकण रेल्वेच्या कामाची जागतिक पातळीवर नोंद घेण्यात आली आहे. कोकणातील कामानंतरच चिनाब नदीवरील पुलाचे काम कोकण रेल्वेला देण्यात आले आहे. मात्र, आता दुपदरीकरण करताना उत्खनन करताना योग्य सुरक्षेची काळजी न घेतल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक उपेंद्र शेंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, सुट्टीवर असल्याचे कारण देत त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली.महाडजवळ सापे रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या कामाबाबत स्थानिक प्रशासनाला काहीच माहिती नाही. मातीचे उत्खनन ज्या टेकडीवर सुरू आहे. त्या जागेपासून भराव टाकण्याची जागा साधारण एका अंतरावर आहे. यामुळे या मातीची रॉयल्टी भरणे अपेक्षित होते; मात्र महाड महसूलकडे याबाबतचा कोणताच प्रस्ताव कोकण रेल्वे किंवा हे काम करीत असलेल्या ठेकेदाराने दिलेला नाही. त्यामुळे महाड प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी हे उत्खनन अनधिकृत ठरवले आहे.डिसेंबर २०१७मध्ये याच कामाबाबत स्थानिक तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी पंचनामा करून अहवाल महसूल विभागाकडे जमा केला आहे. अद्याप, यावर कोणतीच कारवाई न झाल्याने रेल्वे प्रशासन आणि ठेकेदार यांनी हे काम तसेच पुढे सुरू ठेवले. आता या ठिकाणी डोंगराचे खोदकाम करत पटरीला धोका निर्माण केला आहे.कोकण रेल्वेने टेकडीचे केलेले उत्खनन हे अनधिकृत आहे. याबाबतचा प्रस्ताव आमच्या कार्यालयाकडे सादर करणे गरजेचे होते. मात्र, अद्याप कोणताच प्रस्ताव सादर केलेला नाही. या कामाची पाहणी करून कारवाई करण्यात येईल- विठ्ठल इनामदार, प्रांताधिकारी, महाड

टॅग्स :Raigadरायगड