शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

खारपाडा टोलवसुली बंद

By admin | Updated: August 28, 2015 23:23 IST

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पाताळगंगा नदीवर १९९८-९९ साली बांधलेल्या खारपाडा ब्रिजची टोल आकारणी शुक्रवारी मध्यरात्रीपासून बंद झाली. या ब्रिजचा बांधकाम खर्च

पेण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पाताळगंगा नदीवर १९९८-९९ साली बांधलेल्या खारपाडा ब्रिजची टोल आकारणी शुक्रवारी मध्यरात्रीपासून बंद झाली. या ब्रिजचा बांधकाम खर्च ३३ कोटी ३० लाख आयआरबी बिल्डर्स आणि जोईर व्हेंचर अमेय डेव्हलपर्स यांनी केला होता. ‘बांधा वापरा व हस्तांतरित करा’ या बीओटी तत्त्वावर गेली १५ वर्षे या ब्रिजच्या टोल आकारणीतून जून २०१५ पर्यंत १२१ कोटी १७ लाख ४० हजारांची टोलवसुली करण्यात आली आहे. जुलै व आॅगस्ट महिन्यांत टोल आकारणी वसुलीच्या रकमेचा समावेश केल्यास हा आकडा १२५ कोटींच्या घरात जाण्यात शक्यता आहे. बांधकाम खर्चाच्या चौपटीपेक्षा जास्त रुपयांची झालेली करवसुली आयआरबीने केली आहे. टोलवसुलीची अंतिम तारीख संपण्यापूर्वीच आयआरबी बिल्डर्सने आपले सामान हलवाहलवी करण्यास सुरुवात केली आहे. या ब्रिजचे सर्व अधिकार एनएचआयचे प्रकल्प संचालक फेगडे व सहाय्यक प्रकल्प संचालक आगरखाल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.खारपाडा टोलनाक्यावर खारपाडा गाव व परिसरातील अनेक कुटुंबे या ठिकाणी काकडी, टरबूज, कलिंगड व इतर फळांच्या काप करून प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये १० रुपये प्रति वाटा याप्रमाणे प्रवासी व वाहनचालकांना फळे विकून रोजीरोटी कमावित होते. नाक्यावर वाहने थांबणार नसल्याने याठिकाणचा फ्रूटसॅलेडचा धंदा बंद होणार आहे. गेली १५ वर्षे या ५० ते ६० कुटुंबांना या टोलनाक्याने चांगला रोजगार मिळत होता तो बंद होणार आहे त्यामुळे खारपाडा टोल बंद झाल्यावर या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या स्थानिकांवर मोठा आघात होणार आहे. (वार्ताहर)वर्षनिहाय टोलवसुलीवर्षवसुली (लाखांत)१९९९ - २०००४१५.८१ २००० - २००१४१६.०० २००१ - २००२६७५.००२००२ - २००३६८१.०० २००३ - २००४६३९.०० २००४ - २००५६८४.०० २००५ - २००६९६०.०० २००६ - २००७८६७.८० २००७ - २००८७४९.३३ २००८ - २००९७०५.१५ २००९ - २०१०६७२.२२ २०१० - २०११७४१.५२ २०११ - २०१२७४८.४५ २०१२ - २०१३८५९.६५ २०१३ - २०१४८२२.३० २०१४ - २०१५८५३.१२ २०१५ - २०१६२२७.४० एकूण१२१,१७.८१ बीओटी तत्त्वावर गेली १५ वर्षे या ब्रिजच्या टोल आकारणीतून जून २०१५ पर्यंत १२१ कोटी १७ लाख ४० हजारांची टोलवसुली करण्यात आली आहे. स्थानिकांचा रोजगार बंद : खारपाडा टोलनाक्यावर काम करणाऱ्या ५० ते ६० स्थानिक रोजंदारी कामगारांची रोजीरोटी बंद होणार आहे. या कामगारांनी गेली पंधरा वर्षे आयआरबी बिल्डर्स कंपनीचा वसुलीचा आर्थिक व्यवहार सांभाळला. त्यांच्या पंधरा वर्षांच्या श्रमाचा प्रश्न व सर्व्हिस रकमेबाबत पेणचे आ. धैर्यशील पाटील यांनी ठेकेदार कंपनी व्यवस्थापनाशी सामंजस्य तडजोड करून निकाली काढला आहे.