शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत महाविद्यालयाचा प्रथम क्रमांक

By admin | Updated: December 22, 2016 06:18 IST

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना उद्योगाची जोड कशी देता येईल यासाठी आयआयटीमध्ये तंत्रमहोत्सवात आयडीएट नावाची स्पर्धा

कर्जत : विद्यार्थ्यांच्या कल्पनांना उद्योगाची जोड कशी देता येईल यासाठी आयआयटीमध्ये तंत्रमहोत्सवात आयडीएट नावाची स्पर्धा घेण्यात आली. टेकफेस्ट इनोव्हेशन चॅलेंजमध्ये कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथील संकेत इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनियरिंग स्टडीज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पॅट्रीयट नावाचा घरबसल्या शेतीवर लक्ष ठेवता येणारा प्रकल्प बनविला होता. त्यास प्रथम क्र मांक मिळाला आहे.आयओटीच्या तंत्रज्ञानाचा नावीन्यपूर्णरीत्या उपयोग करून प्रत्येकाला शेतकरी बनण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी व भारताला खऱ्या अर्थाने कृषीप्रधान देश बनवून शेतकऱ्याला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथील संकेत इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनियरिंग स्टडीज महाविद्यालयातील धनश्री म्हसे, नम्रता थोरवे, प्रियांका गोसावी, अक्षयी धुळे या विद्यार्थ्यांनी सूरज टाकेकर, शिरीष पाटील, गायत्री सावंत आदी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली पॅट्रीयट नावाचा घरबसल्या शेतीवर लक्ष ठेवता येणारा प्रकल्प विकसित केला होता. यामध्ये शहरातील एखादी व्यक्ती शेत विकत घेऊन त्याची राखण करण्यासाठी गावातील एखादा व्यक्ती ठेवू शकतो. मात्र शेतात नेमके काय सुरू आहे याबाबत तपशील शहरातील माणसाला दिवसाच्या कोणत्याही वेळेला घेता येणे शक्य होणार आहे. यासाठी या विद्यार्थ्यांनी आयओटीचा वापर केला आहे. शेतातील बुजगावण्याच्या दोन्ही हातांवर एक चीप बसविण्यात आली आहे. यामध्ये सेल्फी मॉड्युल वापरण्यात आला आहे. यात झाडांसमोर कॅमेरा बसविण्यात आला आहे. या कॅमेऱ्यातून झाड त्यांचे छायाचित्र टिपून ते सोशल मीडियावर शेअर करणार आहे. यामुळे झाडाला कोणता आजार झाला आहे याचा तपशील मिळणार आहे. या आजारावर उत्तर देण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे एखाद्या शहरी माणसाला घरबसल्या शेती करता येणे शक्य होणार असल्याचे सांगण्यात आले.आशिया खंडातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमध्ये या प्रोजेक्टला प्रथम क्र मांक मिळाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. (वार्ताहर)