शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

कळंब परिसरात वणव्यांचे प्रमाण वाढले

By admin | Updated: April 21, 2017 00:23 IST

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासून वणवे लागण्याचे प्रमाण वाढत आहे. शेती कसण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याने ओसाड पडलेली जमीन

नेरळ : दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासून वणवे लागण्याचे प्रमाण वाढत आहे. शेती कसण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याने ओसाड पडलेली जमीन, ओसाड माळराने यामुळे वणव्यांचे प्रकार अधिक वाढत असून यामुळे वनसंपत्तीचा आणि जमिनीतील उपयुक्त जीवांचा नाश होत आहे. पर्यायाने पर्यावरणाला मोठे नुकसान होत आहे. हे वणवे मानवनिर्मित असल्याने ग्रामपातळीवर वणवामुक्त मोहीम राबविणे गरजेचे आहे. यासाठी वन विभागाने पुढाकार घेऊन ग्रामपंचायतींना सहभागी करून लोकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. परंतु असे होताना दिसत नसल्याने याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड परिसरातील नागरिकांकडून होत आहे.तालुक्यातील अनेक डोंगर दऱ्यांमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गवत व झाडेझुडपे वाढत असतात. गवत पेटविल्याने तेथे चांगले गवत उगवते अशी मानसिकता लोकांची आहे. त्यामुळे हे वणवे लागण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वनसंपत्ती, सांैदर्य नष्ट पावत आहे. या परिसरात स्थानिक लोकांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु काही जण जमीन न कसता, नोकरी करत असतात. त्यामुळे शेतीकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे शेतीविषयक ज्ञान व जागृतीचा अभाव दिसतो.काही ठिकाणी ओसाड जमिनी आणि त्या ठिकाणी वाढलेले गवत, राब भाजवणी पद्धत यामुळे वणव्यांचे प्रमाण वाढत आहे. मार्च-एप्रिल-मे महिन्यात वणव्यांचे प्रमाण वाढते. संपूर्ण माळराने या वणव्यात बेचिराख होत असतात, छोटी मोठी झाडेही जळून जातात. काही अर्धवट जळतात, ती झाडे वृक्षतोड करणाऱ्यांकडून लक्ष्य केली जातात. त्यामुळे अशा वणव्यांमुळे व वृक्षतोडीमुळे नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास होत असून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची सर्वांत मोठी हानी करणाऱ्या या वणव्यांमुळे अनेक आंब्याची, काजूची आदी झाडे नष्ट होत आहे. त्यामुळे लहान मुलांसारखी जतन केलेली झाडे नष्ट होतात. वनविभागाने प्रबोधन केल्यास वणव्याचे दुष्परिणाम लोकांच्या निदर्शनात आणून दिल्यास वणवा मुक्तीची मोहीम सफल होईल.परंतु जीवसृष्टीच्या रक्षणासाठी लोकजागृती, स्थानिक मंडळे, कार्यकर्ते व वन विभाग प्रशासन यांनी प्रबोधन मार्गाचा अवलंब करणे गरजेचे आहे. वणवा लावणाऱ्यांसाठी ग्रामपंचायतीमध्ये कठोर शिक्षेची तरतूद करून कार्यवाही केली पाहिजे, असे तज्ज्ञ मंडळींचे मत आहे. (वार्ताहर)