शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

जोगीलकर कुटुंबाचा स्वत:च्या घरावर हातोडा, चौपदरीकरणाचे काम लवकर होण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 03:10 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुस-या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम सध्या शासन पातळीवर सुरू आहे. बाधित शेतक-यांना मोबदला देणे, हरकती, नोटिसा या पातळीवर सध्या हे काम सुरू आहे.

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुस-या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम सध्या शासन पातळीवर सुरू आहे. बाधित शेतक-यांना मोबदला देणे, हरकती, नोटिसा या पातळीवर सध्या हे काम सुरू आहे. मोबदला मिळाल्यानंतर शासनाच्या नोटिशीची वाट न बघता, स्वत:च्या हाताने घरावर हातोडा चालवून महाड शहरानजीक साहिलनगर येथील हमीद जोगीलकर यांनी चौपदरीकरणासाठी जागा खाली करून देण्यास प्रथम सुरुवात केली आहे.प्रत्यक्ष चौपदरीकरणाच्या कामात अजून किती वेळ जाईल हे माहीत नसले, तरी चौपदरीकरणाचे काम लवकर सुरू होऊन पूर्ण व्हावे आणि निष्पाप प्रवाशांचा जीव वाचावा, या भावनेतून आपण हे केल्याचे जोगीलकर कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मुंबई-गोवा महामार्ग हा ब्रिटिशकालीन महामार्ग आहे. महाराष्टÑातून नवीन झालेल्या अनेक रस्त्यांचे रूपांतर महामार्गात झाले. त्यांचे चौपदरीकरण झाले. आता सध्या हे महामार्ग सहापदरी करणाच्या प्रतीक्षेत आहेत. मुंबई-गोवा महामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा. ‘उत्सव काळात विघ्न’ अशी धारणा प्रवाशांची झाली होती. अनेक संघटना, पत्रकारांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी आंदोलनदेखील केले. निष्पाप प्रवाशांचे जाणारे जीव नागरिकांकडून केली जाणारी चौपदरीकरणाची मागणी याची दखल कधीच महाराष्टÑ शासनाने घेतली नाही. २००५-०६पासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे वारे वाहू लागले. पनवेल ते इंदापूर चौपदरीकरणाच्या कामाला प्रारंभ झाला. अद्याप हे काम पूर्ण झाले नसले तरी लवकरच हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा प्रवाशांना आहे.गतवर्षी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुसºया टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम शासनाने हाती घेतले. इंदापूर ते पोलादपूर अशा सुमारे ५५ कि.मी. अंतरामध्ये हे चौपदरीकरणाचे काम केले जाणार आहे. शासनाच्या कार्यालयीन पातळीवर हे काम सध्या सुरू असून नोटिसा, हरकती, ताबा आदी विवाद सोडवण्याचे काम केले जात आहे. अनेक बाधित शेतकरी, ग्रामस्थांना जागांचा मोबदलादेखील देण्यात आलेला नाही. नियमाप्रमाणे मोबदला मिळाल्यापासून ९० दिवसांत संबंधित शेतकºयांनी अगर ग्रामस्थांनी आपली जागा खाली करून द्यावयाची आहे. मोबदला मिळाला तरी पाऊस आणि पर्यायी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक जणांनी आपली घरे सोडलेली नाहीत. पाऊस आणि पर्यायी जागा याची तमा न बाळगता महामार्गाचे काम लवकर सुरू व्हावे, आपल्यापासून महामार्गाच्या कामात कोणताच अडथळा येऊ नये, म्हणून जोगीलकर कुटुंबीयांनी दोन मजली घराच्या इमारतीवर हातोडा चालवून तोडकाम सुरू केले आहे.>महाडवासीयांना वाढीव दर द्यावामाणगावप्रमाणे मोबदल्याची मागणी चौपदरीकरणाच्या कामात महाड आणि माणगाववासीयांमध्ये शासनाने दुजाभाव केला आहे.लोणेरे ते माणगाव येथील जमिनींना १० ते ११ लाख रुपये गुठ्यांचा दर देत असताना, महाड शहरालगत प्रभावक्षेत्र साहिलनगर येत असताना, आम्हाला कमी दर शासनाने दिला आहे.शासनाने याचा फेरविचार करून माणगावप्रमाणे महाडवासीयांना वाढीव दर द्यावा, अशी मागणी जोगीलकर यांनी केली आहे. आमचे घर महामार्गावर आहे.महामार्गावर होणाºया अपघाताची दुर्दशा नेहमी पाहतो. रस्ता अरुंद असल्यामुळे अनेक अपघात होतात. शासनाने चौपदरीकरणाचे काम सुरू केले आहे. त्यात कोणती अडचण येऊ नये, म्हणून आम्ही हे पहिले पाऊल टाकल्याचे हमीद जोगीलकर यांनी सांगितले.