जोधपूर एक्स्प्रेसच्या प्रवाशांचा बदलापूर स्थानकात गोंधळ; सामान चोरीला गेल्यामुळे चेन खेचून गाडी थांबविली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 09:33 IST2025-12-15T09:32:55+5:302025-12-15T09:33:17+5:30
लोकल प्रवाशांना फटका

जोधपूर एक्स्प्रेसच्या प्रवाशांचा बदलापूर स्थानकात गोंधळ; सामान चोरीला गेल्यामुळे चेन खेचून गाडी थांबविली
बदलापूर : साहित्य चोरीला गेल्याचा आरोप करत, प्रवाशांनी चेन खेचून बदलापूर स्थानकात एक्स्प्रेस थांबवून गोंधळ घातला. शनिवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. यामुळे सीएसएमटी-बदलापूर लोकल रखडल्याने फटका बसला. अनेक प्रवाशांना एक्स्प्रेस शनिवारी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ ते बदलापूरदरम्यान काही प्रवाशांनी आपले सामान चोरीला गेल्याचा आरोप करत चेन खेचली.
अंबरनाथ आणि दरम्यान एक्स्प्रेस बदलापूरच्या थांबविण्यात आली. त्यानंतर, पुन्हा या प्रवाशांनी बदलापूर रेल्वे स्थानक येताच, चेन खेचून गाडी गोंधळ घातला. तक्रार करूनही रेल्वे प्रशासनाकडून योग्य ती उत्तरे मिळत नसल्यामुळे प्रवासी संतापले होते, तर काही प्रवाशांनी गाडीतील स्वच्छतागृहाचे दरवाजे लॉक असल्याचा आरोपही केला. दरम्यान, एक्स्प्रेसची चेन खेचल्यानंतर प्रवाशांवर कारवाईच्या अनुषंगाने त्यांचे आधार कार्ड घेतल्यामुळे प्रवासी आणखीच संतापले.
फुकट्या प्रवाशांबाबत प्रशासन ढिम्म
जोधपूर एक्स्प्रेसमधून अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या होत्या. तरीही रेल्वे प्रशासनाने त्यावर कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे प्रवासी संतप्त झाले होते.
तासभर राडा
बदलापूर स्थानकात गाडी पुन्हा प्रवाशांनी रोखून धरल्यामुळे मागून येणाऱ्या सर्व गाड्या खोळंबल्या होत्या. त्यामुळे एक्स्प्रेसमधील प्रवासी आणि लोकलची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांमध्ये वाद झाला. तब्बल तासभर चाललेल्या या राड्यानंतर रेल्वेसुरक्षा दलाने प्रवाशांची समजूत काढून एक्स्प्रेस पुढे सरकवली आणि त्यानंतर लोकलसेवा पूर्ववत करण्यात आली.
"रात्री बदलापूर स्थानकात गोंधळ झाल्यानंतर, त्यामागे अडकलेल्या लोकलमधील प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. विशेष म्हणजे, लोकलमधील उद्घोषणा यंत्रणा बंद असल्याने नेमके काय झाले आहे, ते प्रवाशांना कळू शकले नाही. एकाच ठिकाणी दीड तास लोकल उभी राहिली. त्यामुळे प्रवासी संतप्त झाले होते." - रत्नाकर पवार, प्रवासी.