शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
3
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
5
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
6
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
7
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
8
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
9
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
10
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
11
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
13
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
14
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
15
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
16
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
17
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
18
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
19
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
20
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी

दोन लाख फुलझाडांनी बहरणार जेएनपीटी महामार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 23:44 IST

जेएनपीटी-मुंबई पोर्ट रोड कंपनी बंदरातील वाढती अवजड वाहतूक सुकर व्हावी आणि वाहतूककोंडीची समस्या दूर करण्यासाठी जेएनपीटीदरम्यान असलेल्या गव्हाण फाटा-जासई-करळ-द्रोणागिरीदरम्यान राष्ट्रीय एनएच-४बी महामार्गावर सात उड्डाणपूल, एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि आठ पदरी रस्ते तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

उरण : जेएनपीटी-गव्हाण फाटा आणि कळंबोली-जेएनपीटी-पळस्पे या एनएच-४बी आठ पदरी राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकांवर नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन लाख विविध प्रकारची आकर्षक शोभिवंत फुलझाडे लावण्यात येत आहेत. या फुलझाडांच्या लागवडीमुळे दररोज या महामार्गावरून ये-जा करणाऱ्या १० हजार वाहतूकदार, प्रवासी, नागरिकांचा प्रवास निश्चितपणे डोळ्यांना सुखावह आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, अशी माहिती नॅशनल हायवे अ‍ॅॅॅथोरिटीचे अध्यक्ष प्रशांत फेगडे यांनी दिली.जेएनपीटी-मुंबई पोर्ट रोड कंपनी बंदरातील वाढती अवजड वाहतूक सुकर व्हावी आणि वाहतूककोंडीची समस्या दूर करण्यासाठी जेएनपीटीदरम्यान असलेल्या गव्हाण फाटा-जासई-करळ-द्रोणागिरीदरम्यान राष्ट्रीय एनएच-४बी महामार्गावर सात उड्डाणपूल, एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि आठ पदरी रस्ते तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे तीन हजार कोटी खर्चाचे काम नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटीकडे सोपविण्यात आले आहे. यापैकी उड्डाणपुलाची काही कामे प्रगतिपथावर आहेत. तर उर्वरित जेएनपीटी-गव्हाण फाटा आणि कळंबोली-जेएनपीटी-पळस्पे या एनएच-४बी राष्ट्रीय महामार्गावरील सहा - आठ पदरी ४२ किमी लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.परिसरातील वाढत्या प्रदूषणाचे संतुलन राखण्यासाठी जीव्हीकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या गव्हाण फाटा -जासई-करळ-द्रोणागिरीदरम्यान राष्ट्रीय एनएच-४बी महामार्गावर एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि आठ पदरी महामार्गावरील रस्त्यांच्या दुभाजकावर सुमारे दोन लाख शोभिवंत फुलझाडे लावण्याची योजना आखण्यात आली आहे. यामध्ये कन्हेरी फुलझाडांच्या जातीतील बिंटी, बोंगणवेल, टिकोमा, तगर, जास्वंद, पॅरेलॉनकस आदी आकर्षक फुलझाडांचा समावेश आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.रस्ते उभारणीसह फुलझाडांची लागवड आणि देखभाल करण्याचे काम जीव्हीकेकडे सोपविण्यात आले आहे. या फुलझाडांच्या लागवडीमुळे दररोज या महामार्गावरून ये-जा करणाºया १० हजार वाहतूकदार, प्रवासी, नागरिकांच्या डोळ्यांना ही वाट सुखावह वाटणार आहे. तसेच जेएनपीटीशी जोडणारे सहा - आठ पदरी रस्ते आणि राष्ट्रीय महामार्ग फुलझाडांनी बहरणार आहेत.लाइट्स रिफ्लेक्शनमुळे होणारे अपघात कमी होण्यास मदतजेएनपीटीदरम्यान असलेल्या गव्हाण फाटा-जासई-करळ-द्रोणागिरीदरम्यान राष्ट्रीय एनएच-४बी महामार्गावर एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि आठ पदरी महामार्गावरील रस्त्यांच्या दुभाजकावर शोभिवंत फुलझाडे लावण्यात येत आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी परस्पर विरुद्ध धावणाºया वाहनांच्या लाइट्सचे रिफ्लेक्शन एकमेकांवर न पडणार नाहीत आणि त्यामुळे रात्रीचे होणारे अपघात कमी होण्यास मदत होईल असे प्रशांत फेगडे यांनी सांगितले.

टॅग्स :JNPTजेएनपीटीRaigadरायगड