जंजिरा किल्ल्याचे दरवाजे पाच महिन्यांनंतर पर्यटकांसाठी खुले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 06:20 IST2025-10-06T06:20:27+5:302025-10-06T06:20:39+5:30
रविवारी पाच महिन्यांनी पुरातत्व विभागाने ऐतिहासिक जंजिरा किल्लाचे दरवाजे पुरातत्व विभागाचे बहुउद्देशीय कर्मचारी-प्रकाश घुगरे यांच्या हस्ते उघडण्यात आले.

जंजिरा किल्ल्याचे दरवाजे पाच महिन्यांनंतर पर्यटकांसाठी खुले
लोकमत न्यूज नेटवर्क
आगरदांडा : मुरुड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पावसाळ्यात शासनाकडून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किल्ल्याचे दरवाजे बंद केले होते. रविवारी पाच महिन्यांनी पुरातत्व विभागाने ऐतिहासिक जंजिरा किल्लाचे दरवाजे पुरातत्व विभागाचे बहुउद्देशीय कर्मचारी-प्रकाश घुगरे यांच्या हस्ते उघडण्यात आले. यामुळे पर्यटकांची व स्थानिक व्यावसायिकांची प्रतीक्षा आता संपली.
किल्ला पाहण्यासाठी शुल्क किती?
किल्ला पाहण्यासाठी १५ वर्षांच्या आतील मुला-मुलींना शुल्क माफ
असून, १६ वर्षांवरील एक व्यक्ती २५ रुपये आकारण्यात येणार आहे. तसेच ऑनलाइन क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया पुरातत्व विभागाचे बहुउद्देशीय कर्मचारी-प्रकाश
घुगरे यांनी दिली. जंजिरा पर्यटक सहकारी संस्था मर्यादित राजपुरी
शिडाच्या बोट चालक मालक यांनी जंजिरा किल्ल्याचे दरवाजे उघडल्याने समाधान व्यक्त केले.
आम्ही किल्ला पाहण्यासाठी दोन दिवसांपूर्वी आलो होतो. परंतु किल्ला बंद असल्याने किल्ला पाहता आला नाही. आज पुरातत्त्व विभागाने किल्ला पाहण्यासाठी आम्हाला परवानगी दिल्याने आम्ही सर्व समाधानी आहोत. - आकाश होळकर, बारामती